

China Vloggers Controversy: Chinese Influencers Show Dhaka Slums as Delhi, India Condemns Campaign
esakal
Chinese Vloggers Anti India Campaign: बांगलादेशची राजधानी ढाका येथील झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते भारताची राजधानी नवी दिल्लीतील असल्याचे भासवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. काही चिनी vloggers आणि लाइव्ह स्ट्रीमर्स गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार करत असल्याचे वृत्त आहे.
चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ प्रसारित केले जात असून, त्यातून भारतातील राहणीमान, स्वच्छता, अन्नपद्धती आणि गरिबीबाबत नकारात्मक चित्र उभे केले जात असल्याचा आरोप आहे.