Russia Ukraine War | युक्रेन युद्धाच्या आडून रशियाचा चीन करुन घेणार फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia And China

Russia Ukraine War | युक्रेन युद्धाच्या आडून रशियाचा चीन करुन घेणार फायदा

सध्या जगाची नजर युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या प्रत्येक निर्णयावर आहे. मात्र त्याचा फायदा चीनला मिळत असल्याचे दिसत आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) बैठकीत रशियाच्या हल्ल्याविरोधात अमेरिका आणि अलबानियाच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. रशियाच्या (Russia) नकाराधिकाराने (व्हेटो) हा प्रस्ताव पडणार होता. मात्र भारत, चीन आणि संयुक्त अरब अमीरात मतदानाला गैरहजर राहिल्याने एक मोठा संदेश गेला. स्पष्ट होते की आशियातील दोन महाशक्ती या प्रकरणी रशियाबरोबर असल्याचे दिसत आहे. युक्रेनवरील (Ukraine) हल्ल्यानंतर भारताने तटस्थतेचा अवलंब केला आहे. त्याचे कारण आहे रशियाबरोबर असलेली जुनी मैत्री आणि एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा आहे. (China Will Get Benefit Of Russia Ukraine War)

मात्र युक्रेन युद्धावरुन रशियाचे समर्थन करणाऱ्या चीनला खरा फायदा होत असल्याचे दिसत आहे. निरीक्षकांच्या मतानुसार चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरुद्ध आणलेल्या प्रस्तावाविरोधात मतदान करण्याच्या तयारीत होता. मात्र अमेरिकेकडून संपर्क साधले गेले आणि चीनने (China) विरोधात मतदानाऐवजी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. या प्रकारे त्या देशाने गैरहजर राहून रशियाला साथ दिली आणि दुसऱ्या बाजूने अमेरिकेला (America) नाराज केले नाही.

इराणबरोबर ४०० बिलियन डाॅलरचा करार

रशियावर लावण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांचाही फायदा चीनला मिळताना दिसत आहे. चीनने एकीकडे रशियातून गहू आयातीशी मंजूरी दिली आहे. दुसरीकडे तिचे रशियाचे तेल आणि गॅस साठ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. पाश्चात्य देशांकडून कशा ही वर बंदी लावल्याचा फायदा चीनला कसा मिळतो, त्याचे सर्वात मोठे उदाहरण इराण आहे. गेल्या वर्षी चीनने इराणबरोबर ४०० बिलियन डाॅलरचा करार केला होता. (Russia Ukraine Conflict)