
लडाखमध्ये भारतासोबत संघर्ष करणे चीनला महागात पडताना दिसत आहे.
बिजिंग- लडाखमध्ये भारतासोबत संघर्ष करणे चीनला महागात पडताना दिसत आहे. लडाखमधील कठोर हवामान सैनिकांना सहन होत नसल्याचं दिसतंय. त्याचमुळे चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून आपल्या 10,000 सैनिकांना मागे येण्यास सांगितलं आहे. असे असले तरी भारताने अशा कोणत्याही बातमी स्वीकार केलेला नाही.
इंडिया टूडेच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला दावा
इंडिया टूडेच्या एका रिपोर्टनुसार, पूर्व लडाखमध्ये चीनने आपल्या जवळपास 10 हजार सैनिकांना परत बोलावलं आहे. सरकारमधील टॉप सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, लडाखमध्ये भारतीय सीमेजवळ चिनी सैनिक ट्रेनिंग करायचे, ती जागा सध्या रिकामी दिसत आहे.
"मराठा आरक्षणात केंद्राची भूमिका महत्त्वाची, सकारात्मक बाजू मांडली तर अनेक...
200 किलोमीटरच्या भागातून चीनने सैनिकांना हटवले
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, भारतीय सीमेपासून 200 किलोमीटरच्या भागातील सैनिकांना चीनने हटवलं आहे. सांगितलं जातंय की चीनने कडाक्याच्या थंडीमुळे हे पाऊल उचललं आहे. चीनचे सैनिक इतक्या उंचीवर राहण्यास सक्षम नाहीत किंवा त्यांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिनी सैनिक आजारी पडत होते. त्यामुळे चीनने आपल्या सैनिकांना परत बोलावलं असल्याचं सांगण्यात येतंय.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, पैंगोंग झीलच्या उत्तर किनाऱ्यावर चीनने आपल्या अनेक सैनिकांना गमावलं आहे. यातील अनेकांना आजारी पडल्यानंतर कमी उंचीच्या भागात असलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले होते. भारत-चीनच्या सीमेवर ऑक्टोबर महिन्यापासून कडाक्याची थंडी पसरली आहे, आता चिनी सैनिकांना याठिकाणी तग धरुन राहणे अशक्य झाले आहे.
तेल, इंधन संपल्यावर काय? सौदीचा प्रिन्स वसवतोय पर्यायी शहर
भारतीय सैन्याजवळ सियाचीनचा अनुभव
लडाखमध्ये चिनी सैन्यासमोर उभे ठाकलेल्या भारतीय सैन्याकडे सियाचिनचा अनुभव आहे. चीनचे सैन्य आतापर्यंत कधीही इतक्या उंचीच्या ठिकाणी तैनात झालेली नाही. त्यामुळे चिनी सैनिकांची स्थिती खराब होताना दिसत आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थितीवर कोणताही बदल झालेला नाही. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तिढा कायम आहे. दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आहेत. LAC वरुन चीनने सैनिक कमी केलं नाही किंवा भारतीय सैनिकांनी आपल्या सैनिकांची संख्या कमी केली नाही.