तेल, इंधन संपल्यावर काय? सौदीचा प्रिन्स वसवतोय पर्यायी शहर

टीम ई सकाळ
Tuesday, 12 January 2021

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे एक नवीन शहर वसवणार आहेत. पर्यावरणपूरक असं हे शहर असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

नियोम - सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे एक नवीन शहर वसवणार आहेत. पर्यावरणपूरक असं हे शहर असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. द लाइन असं नाव त्या शहराचं असेल असंही सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या शहरात रस्ता किवा कार नसतील. नव्या शहरात शून्य कार्बन उत्सर्जन असेल. 

प्रिन्सने नियोम प्रोजेक्ट अंतर्गत जवळपास 172 किलोमीटर लांबीचं शहर वसवण्याची योजना बनवली आहे. जगातलं तेल संपल्यानंतर काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जात असल्याचं म्हटलं आहे. शहराच्या निर्मितीला पुढच्या काही दिवसांमध्ये सुरुवात होईल. याची माहिती प्रिन्सने टीव्हीच्या माध्यमातून दिली. शहर लाल समुद्राच्या किनाऱ्यावर विकसित करण्यात येत आहे. 

हे वाचा - रहस्यमयी तलाव! पाण्याला स्पर्श करताच प्राणी दगडामध्ये बदलतात

सौदीचं हे नवं शहर नियोम 10 लाख लोकसंख्येचं असेल. यामध्ये शाळा, आरोग्यकेंद्रासह इतर सुविधा असणार आहेत. याठिकाणी 3 लाख 80 हजार लोकांसाठी रोजगार उपलब्ध असेल. प्रिन्सने सांगितलं की या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 100 ते 200 बिलियन डॉलर खर्च येईल. 

प्रिन्सने सांगितलं की, नियोम शहरात एक वेगवान अशी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उभारली जाईल. या शहराचा विकास करण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची भूमिका महत्त्वाची असेल. 100 टक्के स्वच्छ वातावरण असणार आहे. इथल्या रहिवाशांना प्रदुषणमुक्त आरोग्य आणि अधिक स्थिर वातावरण मिळेल असा दावा केला आहे.

चीनला भारत देणार टक्कर; खेळण्यांच्या पहिल्या क्लस्टरची कर्नाटकमध्ये पायाभरणी

सौदी हा जगातील प्रमुख कच्च्या तेल निर्यातदार देशांपैकी आघाडीवर असलेला देश आहे. तसंच सर्वाधिक प्रदुषण असलेल्या देशातही सौदीचा वरचा क्रमांक लागलो. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे तेल संपल्यानंतर देशाचं भविष्य काय यादृष्टीने शहराची रचना करत आहेत. नियोम हे शहर 26500 वर्ग किलोमीटर क्षेत्रात असेल. याच्या सीमा जॉर्डन आणि मिस्रला लागून असतील. 2017 नियोमच्या निर्मितीची घोषणा केली होती. सौदीच्या जीडीपीमध्ये 2030 पर्यंत या शहराचे योगदान जवळपास 48 अब्ज डॉलर इतकं असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saudi-arabia-prince announced-build-new-city-no-car-no-road