esakal | पाक नौदलासाठी चीनची प्रगत युद्धनौका
sakal

बोलून बातमी शोधा

warships

उभय मित्र देशांत आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रांत घनिष्ठ संबंध आहेत. त्यातच दोन्ही देशांचा भारताशी सीमेवर संघर्ष झडतो आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे..

पाक नौदलासाठी चीनची प्रगत युद्धनौका

sakal_logo
By
वृत्तसंस्था

शांघाय - चीनने पाकिस्तानच्या नौदलासाठी प्रगत युद्धनौका सज्ज केली असून रविवारी शांघायमध्ये तिचे उद््घाटन करण्यात आले. अशा चार युद्धनौका देण्याचा करार झाला आहे. यातील पहिली युद्धनौका सज्ज करण्यात आली.

हुडाँग झोंगहुआ जहाजबांधणी कारखान्यात झालेल्या कार्यक्रमामुळे युद्धनौकेचे पहिले दर्शन घडले. या कार्यक्रमाला पाक नौदलाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उभय मित्र देशांत आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रांत घनिष्ठ संबंध आहेत. त्यातच दोन्ही देशांचा भारताशी सीमेवर संघर्ष झडतो आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.

उभय देश लष्कराशी संबंधित विविध साधनसामग्रीसह संयुक्त सराव करीत आहेत. यात जेएफ-17 या बहूद्देशीय लढाऊ विमानांचा समावेश आहे.

60 अब्ज डॉलर प्रस्तावित खर्चाच्या महत्त्वाकांक्षी चीन-पाकिस्तान आर्थिक कराराविषयी आक्षेप घेणाऱ्यांना पाकिस्तान-चीन संबंधांद्वारे उत्तर मिळाले आहे. उभय देश या प्रकल्पाचा पाठपुरावा करीत असून अंमलबजावणीतील आणखी वेगाने केली जाईल. त्याचा संपूर्ण विभागाला फायदा होईल. 
- शाह मेहमुद कुरेशी, पाक परराष्ट्र मंत्री

युद्धनौकेची वैशिष्ट्ये

  • टाईप-054 A/P क्लासची युद्धनौका
  • अद्ययावत सामग्रीसह पृष्ठभाग निर्मिती
  • उपपृष्ठभागाचीही तशीच रचना
  • हवेतून येणाऱ्या अस्त्रांचा बिमोड करणारी यंत्रणा
  • लढा व्यवस्थापनासाठी यंत्रणा आणि सेन्सर्स
  • आपल्या क्षेत्रात शांतता-स्थैर्य राखण्यात युद्धनौकेचे महत्त्वपूर्ण योगदान असण्याचा पाकला  विश्वास
  • पाक नौदलामधील एक सर्वांत मोठी व तांत्रिकदृष्ट्या प्रगत युद्धनौका


क्षमता दुप्पट
करारानुसार पुढील वर्षापर्यंत इतर तीन युद्धनौका पाकिस्तानला मिळतील. त्यानंतर पाक नौदलाची क्षमता दुप्पट झालेली असेल असे वृत्त चीनमधील प्रसार माध्यमांनी दिले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चिनी नौदलाच्या वापरात
ही युद्धनौका पीपल्स लिबरेशन आर्मीचे नौदल वापरते. ही युद्धनौका नौदलाचा कणा असल्याचे ते मानतात. 21 तारखेला हैनान या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रिसॉर्टवर चीनचे वँग यी आणि पाकिस्तानचे शाह मेहमूद कुरेशी या उभय देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये व्युहात्मक चर्चेसाठी दुसरी बैठक चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पार पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किंमत 35 कोटी डॉलर
2017 मधील या कराराचे स्वरूप आणि रक्कम याचा तपशील देण्यात आला नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार एका युद्धनौकेची किंमत 35 कोटी डॉलर इतकी आहे.