गलवान खोऱ्यात अखेर सैन्य मारले गेल्याची चीनची कबुली

Chinas Confession Of Casualties about his soldier
Chinas Confession Of Casualties about his soldier

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत २० भारतीय जवान शहीद झाल्याचे भारताने स्पष्ट केले होते. यात चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाल्याचे भारतीय लष्कराने, तसेच काही वृत्तसंस्थांनी म्हटले होते; पण चीनने त्यांच्या मनुष्यहानीबाबत मौन बाळगले होते. या पार्श्वभूमीवर चीनने पहिल्यांदाच मनुष्यहानीची कबुली दिली आहे. या संघर्षात कमांडिंग ऑफिसरसह १६ सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने दिली आहे. मागील आठवड्यात चीनने राजनैतिक आणि लष्करी चर्चेत ही कबुली दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनच्या ताब्यात त्यांच्या सैनिकांचे मृतदेह दिले होते. यात कमांडिंग ऑफिसरसह सुमारे १६ सैनिकांच्या मृतदेहांचा समावेश होता. याचवेळी चीननेही भारताच्या जवानांचे मृतदेह भारताच्या हवाली केले होते. 'एएनआय' वृत्तसंस्थेने आधी चीनचे 43 सैनिक मारले गेल्याचे वृत्त दिले होते. याचबरोबर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या अहवालात चीनचे सुमारे 35 सैनिक मारले गेल्याचे म्हटले होते. मात्र, चीनने मृत्यू झालेल्या सैनिकांचा अधिकृत आकडा अद्यापपर्यंत जाहीर केलेला नाही. अखेर राजनैतिक आणि लष्करी चर्चेदरम्यान चीनकडून १६ सैनिक ठार झाल्याची कबुली चीनला द्यावी लागली आहे. 
--------
अमेरिकेनंतर ब्राझील बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; मृतांची संख्या झाली एवढी
--------
सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट
--------
पुण्यातील दोन खासदार देशातील टॉप फाईव्ह परफॉर्मर! वाचा सविस्तर रिपोर्ट
----------
दरम्यान, भारत आणि चीनच्या सीमेवर सुमारे ४५ वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची घटना घडली होती. चीनसोबत झालेल्या संघर्षात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच भारताने अधिकारी आणि जवान गमावले होते. या आधी अरुणाचल प्रदेशमध्ये १९७५ साली टुलुंग खिंडीत सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते. भारतीय लष्कराने चीनच्या बाजूचे सैनिकही मारले गेल्याचा दावा केला होता. मागील पाच आठवड्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्य आमनेसामने आले असून, दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांनी संघर्ष टाळून माघार घेतल्याचा दावा नुकताच केला होता. आता ही घटना घडल्याने त्यांच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पूर्व लडाखमध्ये पँगाँग त्सो, गल्वान खोरे, डेमचॉक आणि दौलत बेग ओल्डी या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान याआधी संघर्ष झाला आहे. मात्र, यात कोणतीही जिवितहानी झालेली नव्हती. पँगाँग त्सो या भागात अनेक ठिकाणी भारताच्या बाजूला चीनच्या सैन्याने घुसखोरी केली आहेत. भारतीय लष्कराने याला विरोध केला असून, चीनने तातडीने सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी केली आहे. आता गल्वान खोऱ्यातील घटनेने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारत आणि चीन यांच्यातील सीमा ३५०० किलोमीटरची आहे. भारताने गलवानमधील १५ जूनच्या चकमकीनंतर चीनलगतच्या प्रत्यक्ष सीमारेषेनजीक अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. अनेक लढाऊ जेट विमाने त्या भागात घिरट्या घालीत आहेत. सुखोई ३० एमकेआय, जग्वार, मिराज २००० विमाने, अपाची हेलिकॉप्टर्स लेह आणि श्रीनगर येथील हवाई तळांवर पाच दिवसांपासून सज्ज आहेत. भारतीय हवाई दलास सीमेवर चीनच्या काही हालचाली जाणवल्या असून कुठल्याही आपत्कालीन स्थितीस तोंड देण्यास हवाई दल सज्ज असल्याचे हवाई दल प्रमुख भदौरिया यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com