अमेरिकेच्या कारवाईने घायाळ झालेल्या चीनने केला पलटवार

china and america.gif
china and america.gif

बिजिंग- चीन आणि अमेरिकेतील संबंध अधिक बिकट होताना दिसत आहेत. चीनने शुक्रवारी अमेरिकेला चेंगदू येथील वाणिज्य दुतावास बंद करण्यास सांगितलं आहे. अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी चीनला टेक्सास राज्यातील ह्यूस्टन येथील वाणिज्य दुतावास बंद करण्याचा आदेश दिला होता. याविरोधात कारवाई म्हणून चीनने अमेरिकेला आपल्या देशातील वाणिज्य दुतावास बंद करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे चीनने अमेरिकेला जशासतसे उत्तर दिल्याचं दिसत आहे. 

कुलभूषण जाधव यांच्या मदतीचे सर्व मार्ग पाकिस्तानने रोखले!
अमेरिकेने चीनला ह्युस्टन येथे असणाऱ्या वाणिज्य दुतावासाला ७२ तासात बंद करण्याचे आदेश दिले होते. चीनने यावर कठोर प्रतिक्रिया देत अमेरिकाला याचे परिणाम भोगावे लागतील असा गंभीर इशारा दिला होता. तसेच अमेरिकेशी संबंध आता पूर्वीप्रमाणे राहणार नाहीत असंही चीनने म्हटलं होतं. त्यानंतर चीनकडून हा पलटवार करण्यात आला आहे. 

बुधवारी चीनने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. अमेरिकेचे हे उग्र पाऊल असल्याचं चीनने म्हटलं होतं. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि मुत्सद्दी संबंध बिघडतील, असं चीनने म्हटलं. चीनचे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेन्बिन म्हणाले की, मंगळवारी त्यांना याबाबतची माहिती मिळाली की त्यांना ७२ तासांमध्ये वाणिज्य दुतावास बंद करावा लागेल. चीन अमेरिकेला आपला आदेश त्वरित मागे घेण्याचा आग्रह करत आहे. अन्यथा चीन याविरोधात आवश्यक आणि योग्य पाऊल उचलेल.

राजस्थान उच्च न्यायालयाचा सचिन पायलट यांना मोठा दिलासा
अमेरिकेने चीनला दिलेली ही एकतर्फी चिथावणी आहे. जी गंभीर स्वरुपात आंतरराष्ट्रीय कायदा आणि दोन्ही देशातील द्विपक्षीय काऊंसलर कराराचे उल्लंघन करत आहे. चीन अमेरिकेच्या या निर्णयाची कठोर निंदा करते. कारण हे एक चुकीचे पाऊल आहे. यामुळे दोन्ही देशाचे संबंध बिघडतील, असंही वेन्बिन म्हणाले होते. त्यानंतर आज शुक्रवारी चीनने अमेरिकेविरोधात कारवाई केली आहे.

दरम्यान, चिनी वाणिज्य दुतावासात रात्री काही कागदपत्रे जाळली जात होती. त्यानंतर पाणी टाकून आग विझवली जात होती. स्थानिक पोलिसांना याबाबतची लवकरच माहिती मिळाली. पोलिस चिनी वाणिज्य दुतावासाजवळ पोहोचले, पण त्यांना इमारतीमध्ये प्रवेश करु देण्यात आला नाही. या प्रकारामुळे अमेरिकेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. ह्युस्टन पोलिसांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. इमारतीमधून धूर येत असल्याची तक्रार मिळाली होती. पण आम्हाला आत येण्याची परवानगी देण्यात आली नाही, असं पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेने ह्युस्टन हा दुतावास बंद करण्यास चीनवा सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com