चीनची कोविड-19 लस डिसेंबरपर्यंत येणार बाजारात; भारताला मिळणार का?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 19 August 2020

कोरोना विषाणूवरील लस (corona virus vaccine) डिसेंबरपर्यंत  बाजारात येईल, असा दावा चीनने केला आहे.

बिजिंग- कोरोना विषाणूवरील लस (corona virus vaccine) डिसेंबरपर्यंत  बाजारात येईल, असा दावा चीनने केला आहे. कोरोनावरीस लस तयार करणारी चीनची सरकारी कंपनी सिनोफार्मने Sinopharm कोविड लशीची किंमतही जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनच्या कोविड लशीची किंमत जवळजवळ 130 डॉलर (9700 रुपये) असणार आहे. चीनची लस बाजारात लवकरच येणार आहे, पण लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला ही लस मिळेल का, याबाबत शंका आहे.

Corona Updates: देशात मागील 24 तासांत 57,937 जणांनी केली कोरोनावर मात

लशीचे तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील परिक्षण चीनमध्ये सुरु आहे. दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने लशीच्या परिक्षणसाठी अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत आहे. असे असले तरी चीनच्या लशीची यूएईमध्ये चाचणी पार पडत असून 15 हजारा लोकांना लस देण्याची तयारी केली जात आहे.

सिनोफार्म कंपनीने एका वर्षात 22 करोड डोस तयार करण्याची क्षमता असल्याचं सांगितलं आहे. तसेच कोरोनाविरोधात प्रभावी प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी दोन ते तीन डोस द्यावे लागत आहेत. त्यामुळे चीनच्या सर्व नागरिकांनाच ही लस मिळू शकेल काय, याबाबत शंका आहे. चीनची लोकसंख्या 140 कोटी आहे. सर्वांना लशीचा डोस मिळण्यासाठी खूप कालावधी लागणार आहे. त्यामुळे अन्य देशांना लगेच लस मिळण्याची शक्यता कमी आहे. चीनची लस पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. 

चीनच्या पहिल्या कोरोनावरील लशीला Ad5-nCoV पेटेंट मिळालं आहे. या लशीला चिनी सैन्याचे मेजर जनरल चेन वेई आणि CanSino Biologics Inc कंपनी मिळून बनवत आहे. चीनची सरकारी वृत्त संस्था ग्लोबल टाईम्सने लशीला पेटेंट मिळाल्याची माहिती दिली होती. मार्च महिन्यामध्ये या लशीच्या पेटेंटसाठी अर्ज करण्यात आला होता. चीन या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी जगातील अनेक देशांमध्ये घेत आहे. 

पावसाचा जोर ओसरला, धग कायम!, पिके गेली पाण्याखाली; प्रकल्पांमधील जलसाठा वाढला

अमेरिकी वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार चीन कोरोनावरील लस एखाद्या शस्त्राप्रमाणे वापरण्याच्या विचारात आहे. चीन कोविड लशीचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठी करेल. चीन अशाच देशांना लस देणार आहे, ज्यांनी त्याच्या दक्षिण समुद्रातील प्रभुत्वाला मान्य केलं आहे. चीनने ब्राझील, इंडोनेशिया, पाकिस्तान, रशिया आणि फिलीपीन्सला प्राथमिकतेने लस देण्याचे वचन दिले आहे. 

दरम्यान, चीन आणि भारताचे संबंध गेल्या काही दिवसात बिघडले आहेत. शिवाय भारत सरकारने चीनच्या 59 पेक्षा अधिक अॅप्सवर बंदी आणली आहे. भारतात चिनी वस्तूंविरोधात वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थिती चीनने 3-4 महिन्यात लस तयार करण्याचा दावा केला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, चीनची लस भारताला मिळण्याची शक्यता कमी आहे. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China's covid vaccine will hit the market by December India