Coronavirus : चीनमध्ये मृतांची संख्या पोहचली तीन हजारांवर

पीटीआय
मंगळवार, 3 मार्च 2020

इराणमध्ये खामेनींच्या सल्लागाराचा मृत्यू
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार मोहंमद मीरमोहंमदी यांना कोरोनाव्हायरसची बाधा झाल्याने मृत्यू झाल्याचे आज जाहीर करण्यात आले. कोरोनाची बाधा झाल्याने ते आजारी पडले होते, असे सरकारी रेडिओने म्हटले आहे. इराणमध्ये कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या ६६ वर पोचली असून, आतापर्यंत १५०१ जणांना बाधा झाली आहे. ७१ वर्षीय मीरमोहंमदी यांचे उत्तर तेहरानच्या रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

बीजिंग - कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये मृतांची संख्या आज ३ हजारांवर पोचली आहे. गेल्या चोवीस तासांत ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्गाची तीव्रता कमी होत असून, प्रसारामुळे नव्याने उघडकीस येणाऱ्या प्रकारातही घट झाल्याचे सांगितले आहे. चीनसह जगभरात आतापर्यंत ८८ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग आणि सरकारकडून युद्धपातळीवर काम केले जात आहे. चीननंतर सर्वाधिक मृत्यू इराणमध्ये झाले आहेत. दक्षिण कोरियात बाधित रुग्णांची संख्या ४ हजारांवर पोचली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दक्षिण कोरियात अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.  

Coronavirus:चीनमध्ये कोरोना चेकपोस्टवर तपास अधिकाऱ्यांवर हल्ला; तरुणाला थेट मृत्यूदंड

जगातील ७० हून अधिक देशांनी दक्षिण कोरियाच्या प्रवासावर बंदी घातली आहे. दरम्यान, इंडोनेशियात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. तत्पूर्वी रविवारी अमेरिकेत कोरोनाचा पहिला बळी गेल्याचे जाहीर केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinas death person reaches to 3000