चीनच्या पहिल्या मंगळ मोहिमेला सुरुवात; ‘तिआनवेन-१’ या उपग्रहाचे केले प्रक्षेपण

पीटीआय
Friday, 24 July 2020

चीनने आज त्यांच्या पहिल्या मंगळ मोहिमेला सुरुवात करताना ‘तिआनवेन-१’ (अंतिम सत्याचा शोध) या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. हैनान प्रांतातील वेनचँग अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. मंगळाचे चहूबाजूंनी निरीक्षण करणे, मंगळावर उतरणे आणि मंगळाच्या भूमीवर बग्गी उतरवून अभ्यास करणे, ही या मोहिमेची प्रमुख तीन उद्दीष्ट्ये आहेत.

बीजिंग - चीनने आज त्यांच्या पहिल्या मंगळ मोहिमेला सुरुवात करताना ‘तिआनवेन-१’ (अंतिम सत्याचा शोध) या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. हैनान प्रांतातील वेनचँग अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. मंगळाचे चहूबाजूंनी निरीक्षण करणे, मंगळावर उतरणे आणि मंगळाच्या भूमीवर बग्गी उतरवून अभ्यास करणे, ही या मोहिमेची प्रमुख तीन उद्दीष्ट्ये आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संयुक्त अरब अमिरातीने तीन दिवसांपूर्वीच ‘अल अमल’ हा उपग्रह मंगळाच्या दिशेने सोडला आहे. त्यानंतर आज चीनने ‘लाँग मार्च -५’ या त्यांच्याकडील सर्वांत शक्तीशाली रॉकेटच्या साह्याने ‘तिआनवेन-१’चे प्रक्षेपण केले. हा उपग्रह सात महिने प्रवास करून मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल, असे चीन सरकारच्या ‘चायना एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन’ या संस्थेने सांगितले. हा मंगळावरील मातीचा, पर्यावरण, वातावरण, पाणी आणि भूरचना यांचा अभ्यास करणार आहे. हा उपग्रह मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर त्याचे ऑर्बिटर (कक्षेत फिरणारे यान), लँडर आणि बग्गी हे तिन्ही भाग वेगळे होतील. ऑर्बिटर इतर अभ्यासासाठी कक्षेतच राहणार असून लँडर मंगळभूमीवर उतरणार आहे. त्यातून सहा चाकांची आणि चौर सौर पॅनेल असलेली बग्गी बाहेर येऊन जमिनीचे निरीक्षण करणार आहे.

आई-वडीलांना मारलेल्या दोन दहशतवाद्यांचा या चिमुरडीने केला खातमा

बग्गीची वैशिष्ट्ये

  • २०० किलो वजन
  • ३ महिने काम करणार
  • ६ शास्त्रीय उपकरणे

मुख्य उद्दीष्ट्ये

  • छायाचित्रे काढणे व नकाशा तयार करणे
  • माती आणि वातावरणाचा अभ्यास
  • माती आणि खडकांच्या रचनेचा अभ्यास करणे
  • पाणी आणि सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध घेणे

कालावधी : ७ महिने
अंतर : ५.५ कोटी किमी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinas first Mars mission begins Launched the satellite Tianwen1