चीनने उभारलेल्या अणुप्रकल्पाचे शरीफ यांच्या हस्ते उद्‌घाटन

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी 340 मेगावॅट ऊर्जानिर्मिती करणाऱ्या अणुऊर्जाप्रकल्पाचे बुधवारी उद्‌घाटन केले. पाकिस्तानातील मिआनवली जिल्ह्यात या अणुप्रकल्पाचे ठिकाण असून चष्मा 3 असे या प्रकल्पाला नाव देण्यात आले आहे, अशी माहिती रेडिओ पाकिस्तान या पाकिस्तानी रेडिओ वाहिनीने दिली आहे.

या वेळी शरीफ यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. घातपाती कारवाया करून देशविरोधी कृत्य करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहू नये, असे आवाहन शरीफ यांनी या वेळी केले. पाकिस्तानने देशाचा बहुमूल्य वेळ मोर्चे, दंगे यांना थोपविण्यात वाया घालवू नये, असेही शरीफ यांनी या वेळी सांगितले. देशातील लोडशेडिंगच्या समस्येवर उपाय शोधण्याला सरकारचे प्राधान्य राहणार आहे. 2018 पर्यंत वीजटंचाईमुक्त पाकिस्तान करण्याचा मानसही शरीफ यांनी या वेळी बोलून दाखविला.

चीनसोबत भागीदारीतून साकारला प्रकल्प
पाकिस्तान ऍटोमिक एनर्जी कमिशन (पीएईसी) व चायना नॅशनल न्यूक्‍लिअर कॉर्पोरेशन (सीएनएनसी) यांच्या संयुक्त भागीदारीतून हा अणुऊर्जा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. आगामी वर्षामध्ये चष्मा 3 च्या धर्तीवर सी 4 प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.

Web Title: Chinas nuclear plant inaugurated by Sharif