म्यानमारमध्ये चिनी फॅक्टरीला आग, लष्कराच्या गोळीबारात 38 जणांचा मृत्यू

myanmar
myanmar

रंगून- सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये हिंसाचार सुरुच आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारात एकूण 39 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. Hlaingthaya येथील एका चिनी फॅक्टरीला आग लावण्यात आली होती. त्यानंतर लष्कराने केलेल्या गोळीबारात 22 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे, तर विविध ठिकाणी झालेल्या गोळीबारात 16 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. एका पोलिस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. सत्तापालटानंतरचा हा सर्वाधिक रक्तरंजित दिवस मानला जात आहे. म्यानमारमधील लष्कराने लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नेता आंग सान स्यू की यांचे सरकार पालटले आहे. लष्कराने आंग सान स्यू की यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांना ताब्यात घेतले. याविरोधात म्यानमारमधील लोकांमध्ये प्रचंड रोष असून त्यांनी रस्त्यावर उतरुन याला विरोध केला आहे. लष्कर आणि आंदोलक यांच्यामध्ये अनेक ठिकाणी झटापटी झाल्या आहेत. यात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. 

चीनच्या दुतावासाने माहिती दिलीय की, अनेक चिनी लोक जखमी झाले आहेत. एका अज्ञाताने फॅक्टरीमध्ये आग लावली. म्यानमारमधील चिनी मालमत्ता आणि नागरिकांचे संरक्षण करण्याचे  आवाहन केले आहे. चीन म्यानमारमधील लष्कराच्या समर्थनात पुढे आली आहे. तसेच सत्तापायल योग्य असल्याचं म्हटलं आहे. फॅक्टरीला आग लागल्यानंतर लष्कराने तेथे असलेल्या आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. त्यात 22 जणांचा मृत्यू झालाय.

म्यानमारच्या लष्कराने 1 फेब्रुवारीला सत्तापालट केला होता. तेव्हापासून देशात लष्कराविरोधात आंदोलन होत आहे. लष्कराने आंदोलनकर्त्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्या आहे. शनिवारी झालेल्या गोळीबारात 13 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला होता. रविवारी विविध ठिकाणी झालेल्या गोळीबारत 38 आंदोलनकर्ते मारले गेले आहेत. आतापर्यंत 126 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच आतापर्यंत 2,150 लोकांना ताब्यात घेण्यात आहे. तसेच, 300 पेक्षा अधिक लोकांची सुटका करण्यात आलीय. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com