
श्रीलंकेत हिंसाचार, माजी पंतप्रधानांनी नाविक तळावर घेतला आश्रय
कोलंबो : श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस (Sri Lanka Economic Crisis) चिघळत आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंहिदा राजपक्षे (Sri Lanka Ex PM Mahinda Rajpaksa) आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य नौदल तळावर आश्रय घेत आहेत. ही माहिती मिळताच आंदोलकांनी नौदल तळावर देखील निदर्शने सुरू केली आहेत.
हेही वाचा: बांगलादेशविरुद्ध श्रीलंका संघाची घोषणा, करुणारत्नेकडं पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी
न्यूजवायरच्या मीडिया रिपोर्टनुसार, कोलंबोमधील अधिकृत निवासस्थान सोडल्यानंतर, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नौदल तळावर ठेवण्यात आले. त्रिकोमाली नौदल तळावर त्यांचा मुक्काम असून याच ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेत आर्थिक संकट आहे. नागरिक अनेक दिवसांपासून महागाईचा सामना करत आहेत. आता जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी उग्र रुप धारण करत सरकारमधील मंत्र्यांवर हल्ले करणं सुरू केले आहे. राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर आंदोलनाचे हिंसाचारात रुपांतर झाले. सोमवारी देशभरात हिंसाचार पाहायला मिळाला. राजपक्षे यांच्या सरकारमधील एका खासदाराची गाडी देखील आंदोलकांनी अडवली. त्यांनी आंदोलकांवर गोळीबार केल्यानंतर एकाचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. त्यानंतर खासदारांनी स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या केली. या हिंसाचारात पाच जणांना मृत्यू झाला आहे.
देशातील हिंसाचाराने भीषण वळण घेतले असताना, राजपक्षे कुटुंबाचे हंबनटोटा येथील वडिलोपार्जित घर निदर्शकांनी पेटवून दिले. याठिकाणी राजपक्षे कुटुंबीयांपैकी अनेकजण अजूनही लपून बसले आहेत. तिथे देखील जमावाने हल्ला केला. यावेळी पोलिसांनी गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
Web Title: Sri Lanka Crisis Ex Pm Shelter At Naval Base Due Protest Rise In Country
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..