ऐकावं ते नवलचं! त्यानं चक्क विजेच्या खांबावर केला व्यायाम; व्हिडिओ व्हायरल

Chinese Man Climbs 30 foot Electricity Pole To Do Sit ups Causes Power Outage In Chengdu
Chinese Man Climbs 30 foot Electricity Pole To Do Sit ups Causes Power Outage In Chengdu

जगभरात अनेक चित्र-विचित्र घटना घडत असतात अशाच एका घटनेत एका व्यक्तीनं चक्क ३० फूट उंचावरील वीजेच्या खांबावर सीटअप्स मारण्याचा वेडा पराक्रम केला आहे. त्याच्या या कृत्यामुळे वीज कंपनीला पावर आउटेज करणं भाग पडलं. त्यामुळे हजारो घरांची वीज गायब झाली. चीनच्या चेंगडू शहरात हा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

हे वेडं धाडस करणाऱ्या संबंधित व्यक्तीचं नाव समोर आलेलं नाही. मात्र, स्थानिक 'पिपल्स डेली' या वृत्तपत्राच्या ट्विटर हँडलवरुन या व्यक्तीचा सीटअप्स मारतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओनुसार, एक व्यक्ती वीजेच्या १० मीटर (३० फूट) खांबावर अगदी टोकावर जाऊन स्टमक क्रंच (सीटअप्स) मारताना दिसत आहे. या व्यक्तीचा हा प्रकार सुरु असताना या खांबाजवळून जाणाऱ्या लोकांना धक्काच बसला, त्यांनी तत्काळ ही बाब स्थानिक वीज कंपनीला कळवली. त्यानंतर वीज कंपनीनं तातडीने मुख्य लाईनवरची वीज घालवली. अचानक झालेल्या या पावर आउटेजमुळे हजारो घरांमध्ये राहणाऱ्यांना याचा फटका बसला, असं पिपल्स डेलीच्या ट्विटर हँडलवर म्हटलं आहे. 

त्याचबरोबर शांघाई शहरातील वृत्तपत्र 'द पेपर'नं देखील याबाबत वृत्त दिलं असून यामध्ये म्हटलं की, संबंधित व्यक्तीच्या या कृत्याची माहिती कळताच तातडीच्या सेवांना पाचारण करण्यात आलं. या व्यक्तीला वाचवण्यासाठी या सर्वजणांनी घटनांस्थळी धाव घेतली. 

अॅलन मस्क यांनी गमावलं श्रीमंत व्यक्तींचं अव्व्ल स्थान; एका ट्विटमुळे बुडाले १५.२ बिलियन डॉलर

दरम्यान, ही व्यक्ती वीजेच्या खांबावर व्यायामासाठी गेली होती की आणखी कशासाठी? याबाबत नक्की माहिती कळू शकलेलं नाही. मात्र, अशा प्रकारच्या कुठल्याही स्टंटची नक्कल करण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन स्थानिक प्रशासनानं नागरिकांनी केलं आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com