भारताला धमकी! अमेरिकेसोबतच्या मैत्रीनं आमचं टेन्शन वाढवू नका, अन्यथा...

China, America, India
China, America, India

बिजिंग : लडाख परिसरातील भारत-चीन तणावपूर्ण परिस्थितीवर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु असताना चीनी सरकारी मीडिया दोन्ही देशांतील वाद भडकवण्याचे काम करत आहे. अलिप्तवादी धोरणाचे पालन करत भारताने अमेरिकेपासून दूर रहावे, असे चीनमधील ग्लोबल टाइम्सने भारताला सुनावले आहे. आमच्या विरोधात भारत अमेरिकेसोबत गेला तर आम्ही योग्य त्या पद्धतीने प्रत्त्युतर देऊ, अशी धमकीच चीन सरकारच्या बाजूने झुकणाऱ्या ग्लोबल टाइम्सने दिली आहे. देशाच्या हितासाठी राजनैतिक किंवा आर्थिक बाबींवर कोणतीही तडजोड करणार नाही, असा उल्लेखही करण्यात आलाय.  

ग्लोबल टाइम्सच्या अग्रलेखात म्हटलंय की, लडाखच्या सीमारेषेवरील तणाव काही प्रमाणात निवळला आहे. यामुळे  दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध उत्तम राहण्यास मदत होईल. आर्थिक आणि व्यापारातील आयात निर्यातीचा दोन्ही देशांना फायदा होईल. भारतामध्ये चीन विरोधातील भावना वेगाने वाढत आहे. या परिस्थितीत दोन्ही देशांतील संबंध ताणले जाण्याची भीती आहे. याचा अर्थव्यस्थेवर परिणाम होईल. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशातील चर्चा सकारात्मक होत आहे. वादग्रस्त मुद्यावरुन निर्माण झालेला तणाव आता कमी झालाय. भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली असताना दोन्ही देशांतील संबंध उत्तम राखणे भारताला देखील फायदेशीरच आहे, असेही या लेखात म्हटले आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारवादी धोरणाची स्थिती गुंतागुंतीची झाली आहे. चीन-अमेरिका यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे. चीन-अमेरिका यांच्यातील शीतयुद्धजन्य परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी एका नव्या व्यापक भागीदारीची घोषणा केली आहे. आतापर्यंत भारताने अलिप्तवादाचे धोरण स्वीकारले होते. हीच भूमिका भारताने सद्यपरिस्थितीत ही कायम ठेवणे अपेक्षित आहे. आपली भूमिका बदलून भारत अमेरिकेच्या बाजूने झुकला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धमकी वजा इशारा ग्लोबल टाम्सने भारताला दिलाय. मोदी सरकारने चीनकडे मैत्रीचा हात पुढे केला तर दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास मदत होईल. पण जर चीनला कमकूवत करण्याच्या उद्देशाने भारताने अमेरिकेला साथ दिली तर त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील. या परिस्थितीत चीन योग्य तो निर्णय घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा उल्लेखही लेखात करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com