China War Practice : तैवानच्या सीमेवर चीनचा युद्धसराव; ‘पीएलए’ची माहिती

तैवानच्या सीमेवर चीन तीन दिवस लष्करा सराव करणार आहे. चीननेच ही घोषणा शनिवारी केली. यानुसार चीनच्या युद्धनौका आणि अनेक लढाऊ विमाने सीमेवर आल्याचे तैवान सरकारने म्हटले आहे.
Taiwan Army
Taiwan Armysakal
Summary

तैवानच्या सीमेवर चीन तीन दिवस लष्करा सराव करणार आहे. चीननेच ही घोषणा शनिवारी केली. यानुसार चीनच्या युद्धनौका आणि अनेक लढाऊ विमाने सीमेवर आल्याचे तैवान सरकारने म्हटले आहे.

बीजिंग - तैवानच्या सीमेवर चीन तीन दिवस लष्करा सराव करणार आहे. चीननेच ही घोषणा शनिवारी केली. यानुसार चीनच्या युद्धनौका आणि अनेक लढाऊ विमाने सीमेवर आल्याचे तैवान सरकारने म्हटले आहे. तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाचे प्रवक्ते केव्हिन मॅकर्थी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेला प्रत्युत्तर म्हणून चीनने हा सराव सुरु केल्याचा दावा त्यांनी केला.

स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तैवानला इशारा म्हणून तीन दिवस लष्करी युद्ध सरावाची घोषणा चीनने आज केली आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) या सैन्यदलाच्या ईस्टर्न थिएटर कमांडने ही घोषणा आज केली. हा युद्धसराव आजपासून सोमवारपर्यंत (ता.१०) पर्यंत चालणार आहे. समुद्रात डागलेल्या क्षेपणास्त्रांसह मागील सरावाची पुनरावृत्ती यावेळी होणार का, हे ‘पीएलए’ने स्पष्ट केलेले नाही. गेल्यावेळी अशी सरावामुळे सागरी व हवाई वाहतूक विस्कळित झाली होती.

मॅकर्थी आणि त्साई यांच्‍यामध्ये गुरुवारी (ता.६) कॅलिफोर्नियामध्ये चर्चा झाली होती. चीनच्या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर अनेक परदेशी प्रतिनिधिनींही वेन यांची भेट घेऊन तैवानला समर्थन दिले आहे. या प्रत्युत्तर म्हणून चीनने त्साई यांच्या अमेरिका दौऱ्याशी संबंधित अमेरिकी गट आणि व्यक्तींवर प्रवास बंदी आणि आर्थिक निर्बंध काल लादले. युद्धसराव म्हणजे तैवानच्या स्वातंत्र्यवादी फुटीर शक्ती आणि बाह्य शक्ती यांच्यातील संगनमत आणि चिथावणीविरूद्ध गंभीर इशारा आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ‘जॉइंट सॉर्ड’ सराव अत्यावश्‍यक आहे, असे ‘पीएलए’ने निवेदनात म्हटले आहे.

आठ युद्धनौका अन ४२ विमाने

चीनच्या आठ युद्धनौका, ४२ विमाने तैवानजवळ आढळल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली. त्यातील २९ विमाने तैवानच्या सामुद्रधुनीच्या सीमेवर पोहचली होती. यामध्ये चीनची ‘चांगडू जे -१०’, ‘शेंगयांग जे -११’ आणि ‘शेंगयांग जे -१६’ या लढाऊ विमानांचा समावेश होता. क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून चिनी विमानांचा माग काढण्यासाठी हवाई आणि सागरी गस्त सुरू करण्यात आली आहे. प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरता धोक्यात आणणाऱ्या अशा अविवेकी कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com