Video: चीनचा सर्वात शक्तीशाली टँक बुडाला 30 सेकंदात...

वृत्तसंस्था
Tuesday, 18 August 2020

चिनी लष्कराचा अँफिबियस रणगाडा सर्वात शक्तीशाली म्हणून ओळखला जात होता. पण, पाण्यामध्ये अवघ्या 30 सेकंदात बुडाल्याने गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून, खरंच शक्तीशाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बीजिंग: चिनी लष्कराचा अँफिबियस रणगाडा सर्वात शक्तीशाली म्हणून ओळखला जात होता. पण, पाण्यामध्ये अवघ्या 30 सेकंदात बुडाल्याने गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून, खरंच शक्तीशाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Video: महिलेचा पती खरोखरच निघाला सुपरहिरो...

चिनी लष्कराचा अँफिबियस रणगाडा रणगाडा पाण्यात आणि जमिनीवर अतिशय सक्षम समजला जात होता. सर्वात शक्तीशाली टँक म्हणून चीन सांगत होता. या टँकचे काम पाण्याच्या आतमध्ये राहून प्रतीक्षा करणे आणि अचानक हल्ला करणे किंवा एखाद्या संशयास्पद वाहनास आवश्यक असल्यास नदी ओलांडण्यापासून थांबविणे असते.  पण, पाण्यामध्ये अवघ्या 30 सेकंदामध्ये बुडाल्याने जागतीक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, चीनचा सर्वात शक्तीशाली टँक 30 सेकंदात बुडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लष्कराचे वाभाडे चव्हाट्यावर आले. पीपल्स लिबरेशन आर्मीची पोलखोल झाली असून, चीनने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Video: कोरोना योद्ध्यांना कडक सॅल्यूट!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinese people liberation army amphibious tank sinking video viral