Video: महिलेचा पती खरोखरच निघाला सुपरहिरो...

वृत्तसंस्था
Monday, 17 August 2020

समुद्रात पती-पत्नी सर्फिंग करत होते. अचानक शार्क नावाचा मासा आला आणि महिलेचा पाय जबड्यात घेतला. पण, पतीने क्षणाचाही विलंब न लावता शार्कच्या अंगावर उडी घेत हाताने ठोसे लगावले.

सिडनी (ऑस्ट्रेलिया): समुद्रात पती-पत्नी सर्फिंग करत होते. अचानक शार्क नावाचा मासा आला आणि महिलेचा पाय जबड्यात घेतला. पण, पतीने क्षणाचाही विलंब न लावता शार्कच्या अंगावर उडी घेत हाताने ठोसे लगावले. अखेर, शार्कने महिलेला सोडले. महिलेचा पती खरोखरच सुपरहिरो निघाला.

Video: भाषण ऐकताना तंबाखू मळणाऱयाने मारली टाळी अन्...

सिडनी मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, न्यू साउथ वेल्स प्रांतातील पोर्ट मॅकरीनमधील शेली कोस्ट येथे ही घटना घडली. माईक रॅप्ले आणि त्यांची पत्नी छॅंटेले डॉयले हे समुद्रात सर्फिंग करत होते. यावेळी अचानक साडेसहा फूट लांबीचा शार्क आला आणि डॉयले यांचा उजवा पाय धरला. या हल्ल्यामुळे डॉयले या पाण्यात पडल्या. माईकने ही घटना पाहिली. त्यांच्याकडे कोणतेही शस्त्रे नव्हते, पण, त्यांनी शार्कवर उडी मारली आणि त्याच्या डोक्यात व पाठीवर ठोसे लावायला सुरवात केली. शार्क घाबरला आणि त्याने डॉयलेचा पाय सोडला. त्यानंतर माइकने पत्नीला समुद्रातून बाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर डॉयलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Video: पाण्यात 16 तास अडकलेल्या युवकाची हवाई दलाकडून सुटका...

दरम्यान, सर्फ लाइव्ह सेव्हिंग न्यू साउथ वेल्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह स्टीव्हन पियर्स यांनी माइकचे कौतुक केले आहे. या घटनेनंतर समुद्रकिनारा बंद करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात न्यू साउथ वेल्समध्ये शार्कने एका 15 वर्षाच्या मुलाची शिकार केली होती. दोन महिन्यांत हा शार्कचा तिसरा हल्ला होता. सुदैवाने महिला बचावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brave husband saved wife from shark by at australia

Tags
टॉपिकस
Topic Tags: