वाटानामे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती म्हणून जपानमधील ११२ वर्षांच्या चिटेस्त्सु वाटानामे यांचे नाव घोषित झाले आहे.

टोकियो -  जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती म्हणून जपानमधील ११२ वर्षांच्या चिटेस्त्सु वाटानामे यांचे नाव घोषित झाले आहे. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डने ही माहिती बुधवारी दिली. त्यांना हा बहुमान येथील शुश्रूषा केंद्रात देण्यात आला. ‘रागाला दूर ठेवणे आणि चेहऱ्यावर कायम हसू ठेवणे’ हा आपल्या दीर्घायुष्याचा मंत्र असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाटानामे यांचा जन्म उत्तर टोकियोतील नैगाटा येथे ५ मार्च १९०७ रोजी झाला. ते विवाहित असून, त्यांना पाच मुले आहेत. ‘‘कस्टर्ड पुडिंग व गोडाचे इतर पदार्थ मला खूप आवडतात. पण, माझ्या आरोग्यासाठी ते घातक आहे,’’ असे वाटानामे यांनी सांगितले.

थरारक : महासागरात बोट उलटल्यानंतर 'त्या' चौघांनी असे काढले 32 दिवस!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chitetsu Watanabe world oldest man living at 112 years old