Christmas Global Celebrations : नाताळच्या सणानिमित्त जगभरात उत्साहाचे वातावरण असून, अमेरिका, युरोप आणि भारतात बाजारपेठा आणि सार्वजनिक स्थळे सजवली आहेत. सुटीचा काळ आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण यामुळे पर्यटन आणि व्यापारातही वाढ झाली आहे.
न्यूयॉर्क, लंडन, नवी दिल्ली : प्रभू येशूच्या जन्मदिवसानिमित्त जगभरात आज नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषत: अमेरिका आणि युरोपमध्ये सणानिमित्त सर्व बाजारपेठा, रस्ते, घरे सजली असून सार्वजनिक ठिकाणीही सजावट करण्यात आली आहे.