Christmas Train : ट्रेन पाहून नेटकऱ्याला हॅरी पाॅटरच्या सीनची आठवण

स्टीम लोकोमोटिव्ह ट्रेन ; ख्रिसमसच्या दिव्यांनी सजली
Christmas train
Christmas trainEsakal

आज जगभरात ख्रिसमस (Christmas) हा सण साजरा होत आहे. भारतात जशी दिवाळी (Diwali) साजरी केली जाते त्याच पध्दतीने ख्रिसमस साजरा केला जातो. क्रिसमस ट्री, रंग-बिरंगी विद्युतरोषणाई , लाल कपड्यातील साॅताक्रुझ, लाल टोपी, लाल कपडे, चाॅकलेट आणि केकची धमाल असते. मार्केट, रेस्टारेंट,चर्च,माॅल्सला सुंदर सजावट केलेली असते. लहान मुलांसाठी खास सजावट केलेली असते. याशिवाय सोशल मीडियावरही व्हिडिओज शेअर होत आहेत. आताही नव्याने आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात रेल्वेला विद्युतरोषणाईने सजवण्यात आले आहे. हा व्हिडिओ आईएएस अधिकारी डॉ. एम. वी. राव (IAS M.V.Rao) यांनी ट्विट केला आहे.

या व्हिडिओत सुरवातीला एक ट्रेन आधीच रुळावर उभी आहे आणि एक ट्रेन लगतच्या रुळावर येत आहे, हे दृश्य पाहताना ट्रेनला आग लागल्याचा भास होतो. बारकाईने पण जर तुम्ही नीट बघितले तर ही ट्रेन रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेली आहे. ती स्टीम लोकोमोटिव्ह ट्रेन आहे जी पूर्णपणे ख्रिसमसच्या दिव्यांनी सजलेली आहे. हा व्हिडिओ हॅम्पशायर, यूकेचा (Hampshire Uk) आहे. या व्हिडिओला आतापर्यत चार हजारपेक्षा जादा पसंदी दर्शवली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका नेटकऱ्याने हॅरी पाॅटरचा सीन आठवला असे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com