
लंडन : भारतीय राज्यघटना हा एक सामाजिक दस्तावेज आहे, जो सर्वजण समान असल्याचा केवळ दिखावा करत नाही तर सत्तेचे संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी व सामान्यांना पुन्हा सन्मान बहाल करण्यासाठी सक्रियपणे हस्तक्षेप करतो, असे गौरवोद्गार सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले. लंडनमधील ऑक्सफर्ड युनियनमधील बीजभाषणात ते बोलत होते.