US Lab : सारखी बीप-बीप आवाज करते म्हणून मशीनच केली बंद! सफाई कर्मचाऱ्यामुळे रिसर्च लॅबचं ८ कोटींचं नुकसान

या रिसर्च लॅबमध्ये असलेल्या सुपर फ्रीजरमध्ये कित्येक स्पेसिमन ठेवण्यात आले होते.
US Lab cleaner
US Lab cleanereSakal

अमेरिकेत एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका रिसर्च लॅबमध्ये मशीनचा आवाज ऐकून वैतागलेल्या सफाई कर्मचाऱ्याने थेट मशीनच बंद केल्यामुळे कित्येक वर्षांचा रिसर्च वाया गेला आहे. यासोबतच या लॅबचं सुमारे ८ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. न्यूयॉर्कमधील ट्रॉय शहरात हा प्रकार समोर आला आहे.

ट्रॉय शहरात असलेल्या सेनसेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट या लॅबमध्ये हा प्रकार घडला. यानंतर रिसर्च लॅबने क्लिनर आणि क्लिनिंगचं कंत्राट घेतलेल्या कंपनीवर खटला दाखल केला आहे. लॅबने कंपनीला किती नुकसानभरपाई मागितली आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

US Lab cleaner
PM Modi in US : अमेरिकेतील गायिकेने गायलं जन-गण-मन, पंतप्रधान मोदींना पाया पडून केलं अभिवादन; पाहा व्हिडिओ

काय आहे प्रकरण?

या रिसर्च लॅबमध्ये असलेल्या सुपर फ्रीजरमध्ये कित्येक स्पेसिमन ठेवण्यात आले होते. या फ्रीजरमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे तो वारंवार बीप-बीप असा आवाज करत होता. या आवाजाला वैतागून ड्यूटीवर असलेल्या सफाई कर्मचाऱ्याने थेट फ्रीजचं बटणच बंद केलं.

यामुळे फ्रीजमधील तापमान हे उणे ११२ डिग्री फॅरेनहाईट वरुन उणे २५.६ डिग्री फॅरेनहाईट एवढं वाढलं. यामुळे फ्रीजरमध्ये असलेले कित्येक स्पेसिमन नष्ट झाले. यामुळे तब्बल २० वर्षांच्या संशोधनावर पाणी फिरले आहे.

पब्लिक सेफ्टी स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, या क्लिनरला आपण बटण दाबून ही मशीन सुरू करत आहोत असं वाटल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्याच्या या चुकीमुळे लॅबचं तब्बल १ मिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे आठ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

US Lab cleaner
Diwali Holiday in US : आली माझ्या घरी ही दिवाळी! न्यूयॉर्कच्या मेयर ऑफिसमध्ये वाजले ढोल ताशे; व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com