दिल्लीतील कॉफी सर्वात महाग....

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

 'सर्विस पार्टनर वन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी, कॉफी हा एक संस्कृतीचाच भाग असून, आपण अगदी ऑफिसच्या ब्रेक मध्ये, घरात कुटुंबाबरोबर आणि मित्रांबरोबर त्याचा आनंद घेत असतो. हा विचार करुनच आम्हाला हे सर्वेक्षण करण्याची प्रेरणा मिळाल्याचे मत व्यक्त केले आहे.

बर्लिन (जर्मनी) - जगभरात कॉफीचे चाहते कमी नाहीत, त्यामुळे आपल्या आवडत्या कॉफिसाठी हे चाहते चांगली किंमत मोजायलाही तयार असतात. 'सर्विस पार्टनर वन' या कंपनीने कॉफीच्या जगभरातील किंमतींचे सर्वेक्षण केले आहे. त्यासाठी जगातल्या 36 देशांमधील 75 शहरांत कॉफीच्या किमतींचे सर्वेक्षण करण्यात आले , त्यात भारतात दिल्लीमध्ये मिळणारी कॉफी ही सर्वात महाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच रियो दि जानेरो, ब्राझिल येथे कॉफीची किंमत सर्वात कमी असल्याचेही या सर्वेक्षणादरम्यान लक्षात आले आहे. 

कॉफी व्यवसायाचे जैवनशैलीतील महत्त्व बघता आणि वाढती मागणी बघता हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरत असल्याचे 'सर्विस पार्टनर वन' या कंपनीने म्हटले आहे. 

कॉफीच्या या किमतींचे सर्वेक्षण चार भागात करण्यात आले. त्यामध्ये कामाच्या ठिकाणी प्यायली जाणारी कॉफी, स्टारबग्सची ग्रॅंड लाते आणि आपल्या घरात केली जाणारी कॉफी अश्या कॉफींच्या किमतीचे सर्वेक्षण करण्यात आले. या व्यतिरिक्त रत्यावर मिळण्याऱ्या कॉफीच्या किमतीचा पण अभ्यास प्रत्येक शहरात करण्यात आला.

 

Web Title: Coffee in delhi is a most expensive coffee in the world