
कोल्डप्लेचा स्टार गायक ख्रिस मार्टिन याच्या घटस्फोटीत पत्नीला एस्ट्रॉनॉमर कंपनीनं तात्पुरती प्रवक्ता म्हणून नेमणूक केलीय. अलिकडेच कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमध्ये एस्ट्रॉनॉमरचे सीईओ आणि एचआर प्रमुख हे किस कॅममध्ये कैद झाले होते. कोल्ड प्ले कॉन्सर्टमधील व्हिडीओनंतर सीईओ अँडी बायरन आणि एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांना राजीनामा द्यावा लागला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता एस्ट्रॉनॉमरने कोल्ड प्लेचा गायक ख्रिस मार्टिनच्या पत्नीला तात्पुरतं प्रवक्ता बनवलंय.