हिलरींनी रंगविले 'ट्रम्पशासित अमेरिकेचे चित्र'

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

ओरलॅंडो - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आज डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन आणि अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आल्यास उद्भवणाऱ्या भयंकर परिस्थितीचे कल्पनाचित्र हिलरी आणि ओबामा यांनी नागरिकांसमोर रंगवत ट्रम्प यांना नाकारण्याचे आवाहन केले.

येथे झालेल्या एका सभेत हिलरी म्हणाल्या, ""ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे, असा विचार करा आणि नंतर ते तुमच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळ करणारे निर्णय घेतील, याची खात्री बाळगा. महिलांचा अनादर, वंशद्वेष याबरोबरच ट्‌विटरवर नव्हे, तर खरोखरीचे युद्ध सुरू होईल.'' दुसऱ्या एका सभेत ओबामा यांनीही हिलरी यांचीच बाजू मांडली. "ट्रम्प यांची उमेदवार म्हणून निवड करणाऱ्यांनाही आपली चूक उमगली असून, ही व्यक्ती अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास अत्यंत अयोग्य आहे. हा आमचा दावा नसून हीच सत्य परिस्थिती आहे. त्यांच्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आपल्याकडे आहे,' असे ओबामा या वेळी म्हणाले.

आरोपांपेक्षा पुरावे महत्त्वाचे
कोणत्याही प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपांपेक्षा पुराव्यांना आणि ठोस निर्णयांना अधिक महत्त्व असते, असे सांगत बराक ओबामा यांनी आज हिलरी यांच्या ई-मेल प्रकरणाबाबत आपले मौन सोडले. हिलरी यांनी परराष्ट्रमंत्री असताना गुंतवणूकदारांना खासगी ई-मेल पाठवून गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. या तपासास आपण परवानगी दिल्याच्या वृत्ताचेही त्यांनी खंडन करत "एफबीआय'ने अचानक चौकशी सुरू करण्याच्या निर्णयाशी सहमत नसल्याचेही सूचित केले.

Web Title: Comment on opposition party by Hillary Clinton