Compostable Underwear : कापड उद्योगात क्रांती ; जून्या अंडरवेअर्स वापरून तयार होणार कंपोस्ट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Compostable Underwear

Compostable Underwear : कापड उद्योगात क्रांती ; जून्या अंडरवेअर्स वापरून तयार होणार कंपोस्ट!

तुमच्या परसबागेत लावलेली पालेभाजी जगवण्यासाठी आता तूमचे अंडरवेअरही मदत करू शकतात. ऐकून जरा आश्चर्य वाटले ना. होय हे खरे आहे. ही एक विचित्र कल्पना वाटत असली तरी ती प्रत्यक्षात आणली आहे. युनायटेड स्टेट्समध्ये, एक ब्रँडने कंपोस्टेबल अंतरवस्त्रांच्या जगात क्रांती केली आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics: जयंत पाटलांच्या निलंबनानंतर पवार ऍक्शन मोडमध्ये; अजित पवारांना केला फोन अन्...

आपण आपले सगळे जुने कपडे दान करू शकतो. मात्र, इनरवेअरर्स जूने झाल्यावर फेकूनच द्यावे लागतात. फेकून दिल्यावर ही ते पर्यावरणासाठी घातकच बनू शकतात. कारण, अंडरगारमेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलास्टेन या मटेरियलची योग्य व्हिलेवाट लागत नाही. यासाठी अमेरिकेतील एका कंपनीने भन्नाट युक्ती शोधून काढली आहे.

हेही वाचा: Mohit Kamboj : 'त्या' कथित घोटाळ्यात कंबोज यांना क्लिनचीट; संजय पांडेंसोबत रंगला होता वाद

अंडरगारमेंट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलास्टेन या मटेरियलचा पुनर्वापर केला जाऊ शकत नाही. ते पर्यावरणासाठी घातक असते. या समस्येवर अमेरिकन कंपनीच्या एका ब्रँडने पिमा कॉटन नावाच्या अंडरवेअरचा शोध लावला आहे.

हेही वाचा: Cyawanprash Disadvantages: या रूग्णांनी चुकूनही च्यवनप्राश खाऊ नये; नाहीतर...

पिमा कॉटन हे पूर्णपणे कंपोस्टेबल कापड आहे. कॅनेडियन उद्योजक स्टेसी ग्रेस यांनी निर्माण केलेला अमेरिकन ब्रँड केंट, यांनी ही कल्पना आस्तित्वात आणली आहे. यासाठी अंडरवेअर्स बनवण्यासाठी सिंथेटिक मटेरियल इलास्टेन, नायलॉन, पॉलिस्टर, स्पॅन्डेक्स अशा मटेरिअलचा वापर बंद करून त्याऐवजी पिमा कॉटन नावाच्या नैसर्गिक आणि सेंद्रिय कापडाचा वापर केला जात आहे.

साऊथ अमेरिकन सिल्क म्हणून ओळखले जाणारे पिमा कॉटन कापड हे पेरू देशात तयार केले जाते. त्याचे अनेक फायदे आहेत.  हे कापड बनवताना त्यामध्ये मायक्रोप्लास्टिक्स आणि कोणत्याही प्रकारचे रसायन वापरले जात नाही. त्यामूळे पिमा कॉटन पर्यावरणासाठी चांगले मानले जात आहे.

हेही वाचा: High Cholesterol: थंडीच्या दिवसांत चुकूनही खाऊ नका या गोष्टी; कोलेस्ट्रॉल वाढल्याने होईल जीवाला धोका

आफ्रिकेमध्ये वाढते कचऱ्याचे ढिग ही एक मोठी समस्या बनली आहे. त्यामूळे अमेरिकतील लॉस एंजेलिसमध्ये असलेल्या केंट या ब्रॅंडने पुरुष आणि महिलांसाठी अंडरवेअर, टी-शर्ट आणि क्रॉप टॉप बनवले आहेत. जे सर्व पूर्णपणे पुनर्वापर करण्यायोग्य आणि बायोडिग्रेडेबल आहेत.

हे कपडे वापरून जूने झाले की, ते तुम्ही ते जमिनीत पुरू शकता. जमीनीत त्यावर प्रक्रिया व्हायला ते 90 दिवसांत कंपोस्ट खत तयार होऊ शकतात. कापड उद्योगात हि एक मोठी क्रांती मानली जात आहे.