Mohit Kamboj : 'त्या' कथित घोटाळ्यात कंबोज यांना क्लिनचीट; संजय पांडेंसोबत रंगला होता वाद

Mohit Kamboj
Mohit KambojEsakal

मुंबई - सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात चौकशा आणि क्लिनचीटने गाजत आहे. राज्यातील शिंदे सरकारने दिशा सालियन प्रकऱणात एसआयटी स्थापन करून आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याचे नियोजन केले आहे. मात्र त्याचवेळी भाजपच्या नेत्याला क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे राजकारण तापणार हे निश्चित.

Mohit Kamboj
राज्यात मास्क सक्ती नाहीच! ‘हे’ १८ जिल्हे कोरोनामुक्त; १५ जिल्ह्यांमध्ये ७ पेक्षा कमी रुग्ण

भाजपचे नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. संजय पांडे आणि मोहित कंबोज यांच्यातील वाद जोरदार चर्चेत होता.

दरम्यान कंबोज यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी संजय पांडे यांनाच अटक झाली होती. मोहित कंबोज यांनी पांडे यांना आव्हान देत त्यांचे आर्थिक घोटाळे बाहेर काढले होते. कथित बँक घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांना EOW करून पूर्णपणे क्लीनचीट देण्यात आली आहे.

Mohit Kamboj
सायकलपोलो स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या मुलीचा मृत्यू; डॉक्टरांनी इंजेक्शन देताच...

या व्यतिरिक्त आर्म्स ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही कंबोज यांची सुटका करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणात कंबोज यांना क्लिन चीट देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com