Coronavirus : कोरोनाचे थैमान; पण मृतांच्या संख्येत...

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

- कोरोनाचे प्रमाण कमी

- 98 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोना व्हायसरने अक्षरश: थैमान घातले. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, यामधील मृतांच्या संख्येत गेल्या दोन दिवसांत 31 टक्क्यांनी घट झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसची 73,333 प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी 12,712 रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहे. मात्र, यामध्ये आत्तापर्यंत 1873 जणांचा मृत्यू झाला. 

98 जणांचा मृत्यू

कोरोनाची लागण झालेल्या आणखी 98 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये 1868 रुग्णांचा सोमवारपर्यंत मृत्यू झाला. तर काल 98 जणांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. 

कोरोनाचे प्रमाण कमी

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, चीनमध्ये याचे प्रमाण जानेवारी महिन्याच्या तुलनेत कमी आहे. जानेवारीपासून पहिल्यांदाच ही संख्या कमी झाली आहे. 

पुणेकरांनो, शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी बाहेर पडताय? वाहतुकीतील बदल लक्षात घ्या!

जपानमध्ये कोरोनाचा पहिला बळी

जपानमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला. मृत महिला जपानची असून, तिचे वय ८० होते. वुहान येथे राहणाऱ्या जपानी नागरिकाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

कोलकाता विमानतळावर दोन संशयित आढळले

कोलकाता विमानतळावर बँकॉंकहून आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत तीन प्रवाशांना बाधा झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conavirus Death toll drops by 31 per cent in 2 days

टॅग्स
टॉपिकस