पुणेकरांनो, शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी बाहेर पडताय? वाहतुकीतील बदल लक्षात घ्या!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

मिरवणुकीची सांगता लाल महाल चौकात होईल. श्री शिवजयंती महोत्सव समितीकडून शनिवारवाडा परिसरातून सकाळी नऊ वाजता मिरवणूक काढण्यात येईल.

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बुधवारी (ता.19) शिवजयंती निमित्त विविध संस्था व संघटनांकडून मिरवणुक काढण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवजयंती निमित्त निघणाऱ्या मुख्य मिरवणुकीची सुरुवात बुधवारी दुपारी चार वाजता भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर येथून होईल. त्यानंतर भवानी पेठ, संत कबीर चौक, लक्ष्मी रस्ता,नाना पेठ, सोन्या मारुती चौक, फडके हौद चौक, जिजामाता चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता या मार्गाने हि मिरवणुक जाणार आहे. मिरवणूकीचा समारोप शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस प्रशालेच्या आवारातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात होणार आहे. 

- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महिला करणार लष्कराचं नेतृत्त्व

मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, मिरवणूक जशी जशी पुढे जाईल, त्यानुसार मागील बाजुचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावर वाहनचालकांनी त्यांची वाहने लावू नयेत. तसेच वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे. 

- ज्येष्ठ मेकअप आर्टीस्ट पंढरीनाथ जुकर काळाच्या पडद्याआड

हमाल पंचायतीच्यावतीने काढण्यात येणारी मिरवणुक बुधवारी सकाळी दहा वाजता सुरू होईल. ही मिरवणूक नाना पेठेतील हमाल पंचायत भवन येथून निघेल. याबरोबरच लष्कर भागातील आझम कॅम्पस येथून सकाळी सव्वा आठ वाजता मिरवणूक निघणार आहे.

- HSC Exam 2020 : विद्यार्थ्यांनो, परिक्षेला जाताय? वाचा ही महत्वाची बातमी

या मिरवणुकीची सांगता लाल महाल चौकात होईल. श्री शिवजयंती महोत्सव समितीकडून शनिवारवाडा परिसरातून सकाळी नऊ वाजता मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक गाडगीळ पुतळा, शिवाजी पूल मार्गे एसएसपीएमएस प्रशालेपर्यंत जाणार आहे. तेथे मिरवणुकीचा समारोप होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the procession of Shiv Jayanti changes in traffic in Pune