

Congo Wedding Turns Tragic as Massive Fire Kills 22 People
मध्य आफ्रिकेतील कांगो देशाच्या राजधानीत इमारतीला आग लागून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाचा सोहळा सुरू असताना घडलेल्या या अग्नितांडवाने मोठी जिवीतहानी झालीय. इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असल्यानं आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही. अनेक जणांचा होरपळून तर काहींचा गुदमरून मृत्यू झाला. यात जखमींची संख्याही जास्त असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.