ट्रम्प यांना भेटण्यासाठी द्या 5 लाख डॉलरची देणगी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

वॉशिंग्टन - 'अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांना सामाजिक कार्यासाठी पैसे उभारण्यापासून रोखल्याने गरजू लोकांना त्याचा त्रास होईल,' असे ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागार केल्लेनी कॉनवे यांनी म्हटले आहे. 
है पैसे उभारण्यामागील हेतूबद्दल वाद सुरू झाल्यावर त्यावर टीका होत असून, अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय चर्चेत आला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलांनी चालविलेल्या एका टेक्सासस्थित स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांना भेटण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्याच्या मोबदल्यात पर्यावरण संवर्धनासाठी लाखो डॉलरच्या देणग्या घेण्यात येत आहेत, असे सेंटर फॉर पब्लिक इंटिग्रिटीने म्हटले आहे. या देणगीदारांची नावे गोपनीय ठेवण्यात येत आहेत. 

राजधानी वॉशिंग्टन येथील वॉल्टर ई. वॉशिंग्टन कन्व्हेंशन सेंटर येथे 21 जानेवारी रोजी 'ओपनिंग डे 2017' हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये खासगी स्वागत समारंभ होणार असून, 16 लोकांना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची मुले व सहकाऱ्यांना भेटण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच इतर कार्यक्रमांची तिकिटे आणि ओपनिंग डेमधील कलाकारांची स्वाक्षरी असलेली गिटार भेट देण्यात येणार आहे. 
 
Web Title: Conway Says People Will Suffer If Trump Sons Are Discouraged From Raising Money For Charity