'कोरोना नैसर्गिक नसून सत्य लपवण्यासाठी चीनकडून मासळी बाजाराचा वापर'

'कोरोना नैसर्गिक नसून सत्य लपवण्यासाठी चीनकडून मासळी बाजाराचा वापर'

बीजिंग - चीनमधील वुहानमध्ये सरकारी नियंत्रणाखालील प्रयोगशाळेतच कोरोना विषाणू तयार केले असल्याचा सनसनाटी खुलासा चीनमधील विषाणुशास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग यान यांनी केला. तसेच, या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांच्याकडे शास्त्रीय पुरावे असल्याचेही ली यांनी सांगितले. या खुलशानंतर चीनवर पुन्हा एकदा सर्व जगाच्या नजरा रोखल्या गेल्या आहेत. 

जगात कोरोनाची लागण सर्वप्रथम चीनमधीव वुहान शहरात झाली आणि नंतर तो जगभरात वेगाने पसरला. यामुळे कोरोना विषणूंची निर्मिती चीननेच जाणीवपूर्वक केली असल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक देशांनी केला तरी चीनने तो फेटाळला होता. दीर्घ काळापासून कोरोनाव्हायरसचा अभ्यास करणाऱ्या डॉ. ली या ‘हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’मध्ये कार्यरत आहेत. कोरोनाच्या साथीला अटकाव करण्यासाठी चीनला अपयश आल्याविरोधात पहिला आवाज ली यांनी उठविला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून त्या याचा अभ्यास करीत आहेत. कोरोनाच्या साथीबद्दल सामान्यांमध्ये जागृती होण्याआधीच या विषाणूंच्या प्रसाराची माहिती चीन सरकारला होती, असा दावाही त्यांनी केला होता. 

विषाणूशास्त्रज्ञ व रोगप्रतिकारशास्त्र असलेल्या डॉ. ली यांना सुरक्षेच्या कारणामुळे अमेरिकेत जाणे भाग पडले. गेल्या शुक्रवारी (ता.११) ‘लूज वुमेन’ या ब्रिटिश चर्चात्मक कार्यक्रमात त्या अज्ञात स्थळावरून सहभागी झाल्या होत्या. त्यात कोरोनाव्हायरवरील त्यांचे संशोधन आणि त्यांच्यापुढील आव्हानांविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. ली-मेंग यान म्हणाल्या...
    डिसेंबर व जानेवारीच्या सुरुवातीला आणि नंतर जानेवारीच्या मध्यावर चीनमध्ये आलेल्या नव्या न्यूमोनियावर दोन संशोधने केली
    जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) सल्लागार असलेल्या त्यांच्या वरिष्ठांना संशोधनातील निष्कर्षांची माहिती दिली
    या संशोधनासंबंधी वाच्यता न करण्यास त्यांना सांगण्यात आले; अन्यथा गायब करण्याची धमकी
    चिनी नववर्षाच्या काळात चीनमधून जगभरात वाहतूक करण्यात आली
    हा विषाणू संसर्गजन्‍य असल्याने व मानवासाठी आणि जागतिक आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने मौन सोडण्याचा निर्णय
    अनेक धमक्या मिळत असूनही सत्य सांगण्याचे धाडस करण्याचे ठरविले. तसे केले नसते तर पश्‍चात्तापाची वेळ आली असती
    अमेरिकेतील प्रसिद्ध चिनी यू ट्यूबरशी १७ जानेवारीला संपर्क साधून हे निष्कर्ष जाहीर

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. ली यांचे दावे
१) कोरोना चीनमधील मच्छीबाजारातून पसलेला नाही
२) सत्य लपविण्यासाठी मासळी बाजाराचा वापर
३) हा विषाणू नैसर्गिक नाही
४) कोरोनाची निर्मिती प्रयोगशाळेत जाणीवपूर्वक करण्यात आली
५) चीन अधिकाऱ्यांना होती माहिती
६) मानवाकडून मानवात संक्रमण आधीपासून होत आहे 
७) सार्स सीओव्ही-२ हा उच्च संक्रमित विषाणू आहे
८) या विषाणूवर नियंत्रण न आणल्यास जागतिक साथ येऊ शकते. पण, तरी अधिकारी गप्प बसले

चीन सरकारवर आरोप
    कोरोनाचे धोके जाहीर करण्याचे ठरविल्यानंतर धमक्या देण्यात आल्या
    ली यांच्याविरोधात खोटी माहिती पसरविण्यासाठी काही लोकांना नोकरीवर ठेवण्यात आले आहे 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विषाणू नष्ट करण्यासाठी
चिनी विषाणुशास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग यान म्हणाल्या की, जीवशास्त्राचे ज्ञान नसले ती विषाणूच्या आकारावरून त्याच्या उत्पत्तीची माहिती मिळू शकते. या विषाणूचा जनुकीय क्रम मानवी बोटांच्या ठशाप्रमाणे आहे. याच्या आधारे हा विषाणू मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होते. विषाणूंचे उच्चाटन करण्यासाठी त्याची निर्मिती कशी झाली हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण आहे. जर चीनने सत्य माहिती उघड केली असती तर आत्तापर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com