कोरोना रुग्णांची संख्या लाखात; तरीसुद्धा या देशात उद्योग सुरु

Corona patients number in the millions; Nevertheless the industry started in this country
Corona patients number in the millions; Nevertheless the industry started in this country

बर्लिन (जर्मनी): सध्या जगभरात कोरोना थैमान घालत असून कोरोनाचा सर्वात जास्त फटका हा अमेरिकेनंतर युरोपियन देशांना बसला आहे. युरोप खंडातील सर्वच प्रमुख देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात  झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. युरोप खंडातील जर्मनी,इटली, स्पेन, फ्रांस, युनाइटेड किंगडम  यासारख्या महत्वाच्या देशात कोरोनाचे लाखाहून अधिक रुग्ण आहेत. याठिकाणी असलेला मृतांचा आकडा सुद्धा लक्षणीय आहे. सध्या जर्मनीमध्ये 1.57 लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्ण असून सुद्धा जर्मनी मध्ये आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असून अनेक उद्योग पूर्ववत सुरु करण्यात आले आहेत.  

जगातील सर्वात जास्त महत्वाच्या ऑटो मोबाईल इंडस्ट्रीचा सर्वात मोठा हिस्सा हा युरोपियन देशांमध्ये आहे. सध्या संपूर्ण जगात असलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदीची लाट सुरु आहे. हि आर्थिक मंदी लॉकडाऊन नंतर सुद्धा बराच काळ राहणार असून ह्याचा विपरीत परिणाम प्रत्येक देशाच्या आर्थिक धोरणांवर आहे. युरोपियन राष्ट्रांना औद्योगिक राष्ट्र म्हंटले जाते. जगातील अनेक महत्वाचे व्यापार हे युरोप खंडातून चालवले जातात. त्यामुळेच जगातील सर्वात जास्त विकसित असे खंड म्हणून युरोप खंडाची ओळख आहे. सध्या युरोप खंडातील प्रत्येक महत्वाच्या देशात लाखो कोरोनाग्रस्त असले तरी आता युरोपने मोकळा श्वास घेण्यास सुरवात केली आहे. आजपासून युरोपातील अनेक प्रांतात व्यवसाय सुरु झाले आहेत. कामगार पुन्हा आपल्या कामावर रुजू होऊन अनेक प्लांट्स उघडले आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आज प्रथमच अनेक कंपंन्या उघडण्यात आल्या आहेत. जर्मनीतील प्रसिद्ध वाहन उत्पादक वोक्सवॅगन कपंनीसुद्धा आजपासून सुरु झाली आहे. 

सध्या युरोपात काय आहे स्थिती:
सध्या युरोप खंडात अमेरिकेनंतर सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. अमेरिकेनंतर सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे युरोप खंडातील स्पेनमध्ये असून याठिकाणी कोरोनाचे 2.26 लाखापेक्षा जास्त रुग्ण असून यातील 23190 नागरिकांचा मृत्यू झाला आहे . त्यानंतर सर्वात जास्त रुग्ण हे इटली मध्ये असून इटलीमध्ये 1.97 लाख पेक्षा जास्त रुग्ण आहेत. इटलीमध्ये मृतांचा आकडा हा 26 हजारांच्या पार पोहचला आहे. जगात सध्या चौथ्या क्रमांकावर फ्रांस असून या देशात 1.62 लाख कोरोनाग्रस्त असून त्यातील 22856 लोकांचा मृत्यू झाला आहे. आकड्यांच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या व लॉकडाऊन शिथिल केलेल्या जर्मनीत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1.57 लाखांच्या पुढे असून याठिकाणी मृतांची संख्या हि 5976 इतकी आहे. 

कोरोनाग्रस्तांचा आकडा लाखात तरीसुद्धा का सुरु होत आहेत उद्योग?
जर्मनीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या हि जरी 1.57 लाख इतकी असली तरी सध्या जर्मनीने मृतांच्या आकड्यावर नियंत्रण मिळवले आहे. जर्मनीमध्ये मृतांचा आकडा हा 5976 इतका आहे. जर्मनीत रविवारी एका दिवसात कोरोनाचे नवीन 1257 रुग्ण मिळाले असून 99 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जर्मनीमध्ये आता नवीन कोरोना संक्रमणाचा आकडा हा घसरला असून मृत्यूदर सुद्धा सर्वात कमी आहे. संपूर्ण जगात लॉकडाऊन असताना आर्थिक दृष्ट्या देशाला मजबूत ठेवण्यासाठी तेथील उद्योग चालू राहावेत असा निर्णय आता घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com