ऑनलाईन क्लास सुरू असतानाच प्राध्यापिकेचा कोरोनाने मृत्यू

वृत्तसंस्था
Monday, 7 September 2020

जगभरात कोरोना व्हायरसमुळे विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाईन शाळा सुरू असताना एका प्राध्यापिकेचा कोरोनामुळे विद्यार्थ्यांसमोर मृत्यू झाल्याची घटना घडली.

ब्युनेस आयरस (अर्जेटिना): जगभरात कोरोना व्हायरसमुळे विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाईन शाळा सुरू असताना एका प्राध्यापिकेचा कोरोनामुळे विद्यार्थ्यांसमोर मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.

जम्बो कोविड सेंटरने भूक-भूक करून मारले हो...

पाओला डी सिमोने (वय 46) असे त्या प्राध्यापिकेचे नाव आहे. पाओला या स्थानिक विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय त्या झूम कॉलवरून शिकवत होत्या. क्लास सुरू असतानाच त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांसमोरच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे धक्का बसला आहे.

दरम्यान, पाओला डी सिमोने यांना चार आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्या होम क्वारंटाईन होत्या. कोरोनाची लागण झालेली असली तरी त्यांना त्यांना फारसा त्रास होत नव्हता. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन क्लास घेणे सुरुच ठेवले होते. दुर्देवाने त्यांचा शिकवत असतानाच मृत्यू झाला. पाओला यांनी कोरोनाची लागण झाली असताना शिकवायला नको होते. त्यांनी पूर्णवेळ आराम करायला हवा होता, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive professor dies while online class