esakal | कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस दिलेल्या महिलेनं 16 आठवड्यांनी शेअर केला अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

jenifer haller

कोरोना व्हायरसवर वॅक्सिनसाठी अनेक देशांमध्ये संशोधन सुरु आहे. अमेरिकेतील एका महिलेवर कोरोना वॅक्सिनची सर्वात पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली होती. 

कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस दिलेल्या महिलेनं 16 आठवड्यांनी शेअर केला अनुभव

sakal_logo
By
सूरज यादव

वॉशिंग्टन - जगभर कोरोनाने हाहाकार माजवला असून याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोना व्हायरसवर वॅक्सिनसाठी अनेक देशांमध्ये संशोधन सुरु आहे. अमेरिकेतील एका महिलेवर कोरोना वॅक्सिनची सर्वात पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली होती. वॅक्सिनच्या संशोधनामध्ये पहिल्या टप्प्यात मार्च महिन्यामध्ये 43 वर्षीय जेनिफर हॉलरला वॅक्सिनचा डोस देण्यात आला होता. तिने आता अनुभव शेअर केला आहे. 

जेनिफरला 16 आठवड्यांपूर्वी कोरोना वॅक्सिनचा डोस दिला होता. त्यानंतर आता तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना वॅक्सिनच्या डोसचा कोणताही निगेटिव्ह परिणाम झाला नसल्याचं तिने म्हटलं आहे. अमेरिकेत सिएटलमध्ये राहणाऱ्या जेनिफरने म्हटलं की, मला सध्या चांगलं वाटत आहे. 

हे वाचा - ‘अज्ञात न्यूमोनिया’ कोरोनापेक्षा घातक; कझाकस्तानमध्ये अनेक बळी गेल्याचा चीनचा दावा

कोरोनाचे mRNA-1273 हे वॅक्सिन अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि मॉडर्न कंपनीने तयार केलं आहे. त्याचा डोस जेनिफर हॉलरला देण्यात आला होता. अमेरिकेच्या केपी वॉशिंग्टन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या वॅक्सिनवर अभ्यास केला जात आहे. अमेरिकेतील कोमो न्यूजच्या वृत्तानुसार जेनिफर हॉलर एका टेक कंपनीत काम करते. तिला वॅक्सिनचा डोस देण्यात आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.

इन्स्टिट्यूटमध्ये 45 जणांना दोन डोस देण्यात आले. या दोन डोसमध्ये एक महिन्याचं अंतर होतं. त्यानंतर डोस देण्यात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येईल. कोरोना वॅक्सिनमुळे त्यांच्या शरीरावर काही परिणाम झाला आहे का याचा अभ्यास करण्यात येणार आहे. संशोधकांनी वेगवेगळ्या वयातील, प्रकृतीच्या लोकांना वेगवेगळे डोस दिले. डॉक्टर लीजा जॅक्सन या रिसर्चचे नेतृत्व करत आहे.

हे वाचा - हाँगकाँगमधून जीव वाचवून अमेरिकेत आलेल्या वैज्ञानिकाचा चीनबाबत धक्कादायक खुलासा 

कंपनीने म्हटलं की, या वॅक्सिनमुळे कोणत्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकत नाही. कारण यामध्ये कोरोना व्हायरस नाही. मॉडर्नाने 18 मे रोजी घोषणा केली होती की, पहिल्या टप्प्यातील रिझल्ट सकारात्मक आहेत. तसंच या वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासाला जुलैमध्ये सुरुवात होईल. तिसऱ्या टप्प्यात 30 हजार लोकांना वॅक्सिनचा डोस दिला जाणार आहे. 

सिएटलमध्ये एका लहानशा टेक कंपनीत काम करणाऱ्या जेनिफरने फेसबुकवर 3 मार्चला वॅक्सिन संशोधनाबाबत पोस्ट दिसली. त्यानंतर वॉशिंग्टन रिसर्च इन्स्टिट्यूटने भरती सुरु केली असल्याचं माहिती होताच त्यासाठी फॉर्मही भरला. दोन दिवसांनी तिला एका नंबरवरून कॉल आता त्यात तिची निवड केल्याचं सांगण्यात आलं होतं.