माणसांसाठी लस कधी? माकडानंतर उंदरावरही लशीचा यशस्वी प्रयोग

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 5 September 2020

बीआयडीएमसी सेंटर फॉर वायरोलॉजी अँण्ड वॅक्सीन रिसर्चचे प्रमुख डॅन बरूच म्हणाले की, 'यापूर्वी एडी-26 आधारित सार्स-सीओवी-2 लशीचा माकडांवर प्रयोग करण्यात आला होता. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही लस उपयुक्त ठरली होती.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पसरला असून याला रोखण्यासाठी विविध देशात लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अमेरिकेच्या जॉन्सन अँण्ड जॉन्सन सहकार्याने विकसित करण्यात येणाऱ्या कोविड 19 लशीचा उंदरावरील प्रयोग यशस्वी झाल्याचे समोर येत आहे. जी लस तयार करण्यात आली आहे त्यामध्ये तयार करण्यात आलेल्या अँटीबॉडीजमुळे उंदरांना कोरोनाची लागण होण्यापासून सुरक्षित ठेवण्यात यश आल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. नेचर मेडिसिन जर्नलने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. उंदरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांना निमोनियासारख्या रोगातून वाचवण्यात लस उपयुक्त ठरली आहे. जॉन्सन अँण्ड जॉन्सन आणि डीकोनेस मेडिकल सेंटर (बीआयडीएमसी) यांनी संयुक्तपणे ही लस तयार केली आहे. यामध्ये  सर्दी, ताप या रोगातील विषाणू असलेल्या 'एडिनोव्हायरस सीरोटाइप 26 (एडी26) चा वापर करण्यात आला आहे. यापूर्वी माकडांवर लस प्रभावी ठरली होती.    

शांततेसाठी विश्‍वासाचे वातावरण आवश्‍यक; राजनाथसिंह यांचा चीनला टोला

बीआयडीएमसी सेंटर फॉर वायरोलॉजी अँण्ड वॅक्सीन रिसर्चचे प्रमुख डॅन बरूच म्हणाले की, 'यापूर्वी एडी-26 आधारित सार्स-सीओवी-2 लशीचा माकडांवर प्रयोग करण्यात आला होता. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही लस उपयुक्त ठरली होती. मात्र  माकडांना सामन्यत: गंभीर आजार होत नाहीत. त्यामुळे याचा मानवावर प्रयोग करण्यापूर्वी उंदरावर चाचणी घेणे महत्त्वाचे होते. उंदरांना निमोनिया आणि सार्स-सीओवी-2 यासारख्या गंभीर रोगापासून वाचवण्यात ही लस उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानंतर याची मानवी चाचणीची तयारी सुरु आहे, असे ते म्हणाले.  

'चोराच्या उलट्या बोंबा' चीन म्हणते; हक्काची एक इंच जमीनही सोडणार नाही

अमेरिकेत कोरोनावरील लस तयार करण्याच्या शर्यतीत तीन कंपन्या आघाडीवर आहेत. या कंपन्यांनी तीन टप्प्यात हजारो स्वयंसेवकांवर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यातील एस्ट्राजेनेका ही कंपनी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीच्या साथीने लशीवर काम करत असून मॉडर्ना कंपनी अमेरिकन नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या सहकार्याने लस तयार करण्यात आघाडीवर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine tested successfully on rat in america