esakal | Coronavirus : पाकिस्तान कोरोनाच्या विळख्यात; रुग्णांची संख्या पोहोचली...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona virus Cases Has Hit 1000 In Pakistan

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना यातून भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तनही सुटु शकलेले नाही. पाकिस्तानात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाकिस्तानात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०००पर्यंत पोहोचली आहे.

Coronavirus : पाकिस्तान कोरोनाच्या विळख्यात; रुग्णांची संख्या पोहोचली...

sakal_logo
By
वृत्तसेवा

इस्लामाबाद : संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना यातून भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तनही सुटु शकलेले नाही. पाकिस्तानात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाकिस्तानात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०००पर्यंत पोहोचली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाकिस्तानमध्ये भारताप्रमाणे पूर्ण लॉकडाउन करण्यात आलेलं नाही. पण, पाकिस्तानातील वेगवेगळया प्रांतांनी परस्पराशी संपर्क बंद केला आहे. पाकिस्तानातून लोक मोठ्या संख्येने इराणला यात्रेसाठी गेले होते. त्यामुळे पुढच्या काही दिवसात पाकिस्तानात कोरोनाग्रस्त नागरिकांची संख्या आणखी वाढू शकते. यात्रेवरुन परतल्यानंतर हे नागरीक वेगवेगळया भागात विखुरले गेले आहेत.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्ण लॉकडाउन करणं म्हणजे कर्फ्यू लागू करणे. लोकांना जबरदस्ती घराच्या आत राहण्यास भाग पाडणे. आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर आपलं पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊलं उचलत आहोत, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले होते.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाने पाकिस्तानात शिरकाव केल्यानंतर तिथे  लॉकडाउन केलं जावं अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, पंतप्रधान इम्रान खान यांनी हे शक्य नसल्याचं सांगितलं. पाकिस्तानातील लोक रोजंदारीवर पोट भरत असल्याचं सांगत इम्रान खान यांनी लॉकडाऊनला स्पष्ट नकार दिला होता. संपूर्ण देश लॉकडाउन करणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.