...म्हणून डॉक्टरने घातले एकावर एक सहा मास्क!

वृत्तसंस्था
Thursday, 16 July 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी जगभरात मास्क वापरले जात आहेत. पण, अनेकजण मास्कमुळे शरिराला श्वास कमी पडत असल्याचे कारण पुढे करतात.

लंडनः जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी जगभरात मास्क वापरले जात आहेत. पण, अनेकजण मास्कमुळे शरिराला श्वास कमी पडत असल्याचे कारण पुढे करतात. एका डॉक्टरने एकावर एक असे सहा मास्क घालून व्हिडिओ शेअर केला आहे.

Video: पोलिसाने महिलेच्या मानेवर दिला पाय...

कोरोनापासून बचाव होण्यासाठी अनेकजण मास्कचा वापर करताना दिसतात. मास्कमुळे शिंकल्यातून किंवा खोकण्याातून बोलण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समुळे होणारा संसर्ग रोखला जाऊ शकतो. पण, अनेकांना मास्कच्या वापराची सवय नसल्यामुळे गुदमरतं किंवा श्वास घ्यायला त्रास होतो, अशा तक्रारी करताना दिसतात. पण, एका अहवालामधून मास्कच्या वापरामुळे शरीराला ऑक्सिजन कमी पडत नसल्याची माहिती पुढे आली आहे.

सोशल मीडियावर एका डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मास्कच्या वापरामुळे ऑक्सनजनची कमतरता भासत नाही, असे या डॉक्टरांनी सांगितले आहे. संबंधित व्हिडीओ ट्विटरवर @DrZeroCraic यांनी शेअर केला आहे. मास्क वापरल्यानंतर ऑक्सिजनचा स्तर कमी होतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ''तोंड झाकण्यासाठी लावलेल्या मास्कने कोणत्याही प्रकारे ऑक्सिजनचा स्तर कमी होत नाही. मी सहा मास्क लावले आहेत. तरीही माझ्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर कमी झालेला नाही. 17 सेकंदात या डॉक्टरने एकावर एक ६ मास्क लावले आहेत. या डॉक्टरच्या बाजूला जे मशीन आहे त्याद्वारे ऑक्सिजनचा स्तर मोजला जात आहे. मास्क लावल्यानंतर डॉक्टरच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९८ ते ९९ च्या मध्ये दिसत आहे. संबंधित डॉक्टर आयलँडच्या डबलिनचे असल्याची माहिती पुढे आली आहे.

Video: बैलाला प्रेम सहन झालं नाही मग त्याने...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus doctor used six mask for cheaking oxygen level