Video: बैलाला प्रेम सहन झालं नाही मग त्याने...

वृत्तसंस्था
Thursday, 16 July 2020

एक गाय आणि बैल लहानपणापासून एकत्र वाढले. पण, कोरोनामुळे मालकाने गायीची विक्री करावी लागली. गायीला टेंपोत चढविल्यानंतर बैल टेंपोमागे धावत सुटला. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.

चेन्नईः एक गाय आणि बैल लहानपणापासून एकत्र वाढले. पण, कोरोनामुळे मालकाने गायीची विक्री करावी लागली. गायीला टेंपोत चढविल्यानंतर बैल टेंपोमागे धावत सुटला. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांचा मुलगा जयप्रदीप याने व्हिडिओ पाहिल्यानंतर गायीचा शोध घेतला आणि पुन्हा दोघांना एकत्र आणले.

10 वर्षांच्या मुलाने 30 सेकंदात लांबवले 10 लाख रुपये...

तमिळनाडूमध्ये गाय आणि बैलाची चर्चा जोरात सुरू आहे. मदुराई येथील घटनेची प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली आहे. बैलाचं नाव मंजामली, तर गायीचं नाव लक्ष्मी. मंदिराच्या परिसरात चहा विक्री करणाऱ्या मुनियांदी नावाच्या एका व्यक्तीने या दोन्ही गाय आणि बैलाची लहानपणापासून देखभाल केली आहे. बैल पालामेदू मंदिराचा आहे. त्याच्यासोबतच मुनियांदी याची गाय लहानाची मोठी झाली. पण, लॉकडाउनमध्ये मुनियांदी यांचा चहाचा व्यवसाय बंद पडला आणि त्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले.

आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे त्यांनी लक्ष्मीची २० हजार रुपयांना विक्री केली. लक्ष्मीची विक्री झाल्यानंतर तिला टेंपोमध्ये चढवण्यात आले. बैलाने हे दृष्य पाहिल्यानंतर त्याला राहवले नाही. त्याने टेंपोला वेढा मारला. टेंपोसमोर घुटमळत राहिला. त्याची चलबिचल सुरू झाली. काय करावे, हे त्याला कळेनासे झाले. टेंपोसमोर उभा राहून रस्ता अडवण्याचाही त्याने प्रयत्न केला. पण, काही वेळानंतर टेंपोचालकाने टेंपो सुरू केला आणि जाऊ लागला. बैलाने टेंपोचा एक किलोमीटर पर्यंत वेगात पाठलाग केला. पण, थकल्यामुळे एका जागेवर थांबून टेंपोकडे पाहातच राहिला. संबंधित घटना एकाने मोबाईलमध्ये कैद केली होती. यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

Video: कोरोना काळात माणुसकीचं असंही दर्शन...

मुक्या प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला. व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. हा व्हिडिओ जयप्रदीप याने पाहिल्यानंतर त्याने गायीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गायीचा शोध लागल्यानंतर त्याने परत विकत घेतला आणि मंदिराला दान केला. यामुळे मंजामली आणि लक्ष्मी पुन्हा एकत्र आले आहे. दरम्यान, मुक्या प्राण्यांची प्रेमकहाणी परिसरात रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bull and cow reunited after a video viral in tamil nadu