Video: पोलिसाने महिलेच्या मानेवर दिला पाय...

वृत्तसंस्था
Thursday, 16 July 2020

एका पोलिसाने महिलेच्या मानेवर पाय दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ ब्राझीलमधील असून, महिलेच्या मानेचे हाड मोडले आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

न्यूयॉर्क: एका पोलिसाने महिलेच्या मानेवर पाय दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ ब्राझीलमधील असून, महिलेच्या मानेचे हाड मोडले आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

10 वर्षांच्या मुलाने 30 सेकंदात लांबवले 10 लाख रुपये...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझीलमधील साओ पाउलो या शहरामधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये एका महिलेच्या मानेवर पोलिस पाय देऊन उभा असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसाला निलंबीत करण्यात आले आहे. मात्र, यामुळे महिलेच्या मानेचे हाड मोडले असून, तिला 16 टाके पडले आहे. राज्याचे राज्यपाल जोआओ डोरिया म्हणाले यांनी सांगितले की, 'या घटनेनंतर शहरातील पोलिसांच्या अंगावर कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे अशा अशाप्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत.'

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील मिनेपोलिस शहरात पोलिसांनी २५ मे रोजी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडसोबतही अशा प्रकारे अत्याचार केला होता. पोलिस अधिकारी डेरेक चॉवेन हा जॉर्जच्या मानेवर गुडघा ठेवून 8 मिनिटे 46 सेंकद उभा होता. श्वास न घेता आल्यामुळे जॉर्जचा मृत्यू झाला. यानंतर जगभरात Black Lives Matter या नावाने आंदोलन सुरू झाले होते. कृष्णवर्णीय लोकांविरोधात पोलिसांच्या क्रूरतेचा वाद पेटला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलन करणाऱ्यांना आतंकवादी म्हटल्यानंतर व्हाईट हाऊस बाहेर मोठा हिसांचार भडकला होता.

Video: बैलाला प्रेम सहन झालं नाही मग त्याने...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brazilian cop seen standing on a black womans neck video viral