चीनच्या आधीच अमेरिकेत पसरू लागला होता कोरोना; अमेरिकेच्याच रिपोर्टचा नवा दावा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

या नव्या अभ्यासामुळे आता दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढू शकतात. 

वॉशिंग्टन :आतापर्यंत संपूर्ण जगानं हे मान्य केलंय की, कोरोना व्हायरस हा चीनच्या वुहान शहरातून पसरला आहे. मात्र, अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल एँड प्रिव्हेन्शनच्या रिपोर्टने या दाव्याला धक्का दिला आहे. त्यांनी कोरोना महामारीशी निगडीत एक नवा खुलासा केला आहे. या सरकारी अभ्यासानुसार, अमेरिकेत मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्येच कोरोना व्हायरस पसरू लागला होता. रिपोर्टनुसार, त्यानंतर काही दिवसांनंतरच तो व्हायरस चीनमध्ये प्राप्त झाला आणि एका महिन्यानंतर आरोग्य प्रशासनाला पहिली केस सापडली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अमेरिका सातत्याने चीनवर व्हायरस पसरवल्याचा आरोप करत राहिली आहे. या नव्या अभ्यासामुळे आता दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढू शकतात. 

हेही वाचा - मच्छीमाराला मिळाली व्हेल माशाची उलटी; रातोरात झाला कोट्यधीश

सीडीसीच्या रिपोर्टमध्ये केला हा दावा
अमेरिकेमधील एका मीडिया संस्थेनुसार, या अभ्यासात असे पुरावे सापडले आहेत ज्यांच्या जोरावर आरोग्य प्रशासनाला संक्रमणाबाबत माहित होण्याआधीपासूनच हा व्हायरस जगभरात पसरू लागला होता. सीडीसीने अमेरिकन रेड क्रॉसचे कलेक्ट केलेले 7,389 ब्लड सँपलचे अध्ययन केले. यामधील 106 मध्ये संक्रमण सापडलं. 
या रुग्णांच्या शरिरात मिळाल्या एँटीबॉडीज
हे सँपल मागच्या वर्षी 13 डिसेंबरपासून 17 जानेवारीदरम्यान घेतले गेले होते. यामध्ये व्हायरसशी दोन हात करण्यासाठी एँटीबॉडीज आहेत का याची टेस्ट करण्यासाठी हे सँपल घेतले गेले होते. रिपोर्टमध्ये  संशोधकांनी म्हटलं की, हे शक्यय की, सार्स-कोव-2 अमेरिकेमध्ये मागच्या डिसेंबरमध्येच आला होता. 

हेही वाचा - निर्दयी! तब्बल 28 वर्षांपासून स्वत:च्या मुलाला अस्वच्छ घरात डांबलं; 'ना दात, ना चालण्याजोगे पाय'

चीनवर अमेरिकेने केलेत वारंवार आरोप
जगभरात कोरोनाचे संकट लादण्यासाठी अमेरिकेने सातत्याने चीनवर आरोप केले आहे आहेत. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला चीनी व्हायरस अशा नावाने देखील संबोधलं होतं. मात्र, चीनने या आरोपांचे खंडन केलं होतं. पण इतर देशांनी चीनवर या व्हायरसबाबतची माहिती लपवणे आणि खोटे बोलण्याचा आरोप लगावला  होता.
चीनने भारतावर लावला आरोप
चीनी अकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांच्या एका टीमने म्हटलंय की कोरोना व्हायरस हा 2019 च्या उन्हाळ्यातच भारतात जन्माला आला होता. भारतात हा व्हायरस प्राण्यांपासून दुषित पाण्यातून माणसाच्या शरिरात गेला. आणि तिथूनच तो वुहानमध्ये गेला असल्याचा दावा चीनने केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus infection spread in america first and then in china american cdc report claim