निर्दयी! तब्बल 28 वर्षांपासून स्वत:च्या मुलाला अस्वच्छ घरात डांबलं; 'ना दात, ना चालण्याजोगे पाय'

crime
crime

स्वीडन : स्वीडनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच मुलाला तब्बल 28 वर्षांसाठी आपल्याच अपार्टमेंटमध्ये डांबून ठेवल्याच्या संशयावरुन स्वीडनमधील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. काल मंगळवारी स्वीडन पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. हा मुलगा अत्यंत कुपोषित अवस्थेत होता. तसेच त्याला दातदेखील नव्हते. या महिलेला आपल्या मुलाला त्याच्या जन्मजात स्वांतत्र्यापासून  बेकायदेशीररित्या वंचित ठेवल्याबद्दल तसेच त्याला शारीरिक हानी पोहोचवल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आली आहे, अशी माहिती स्टॉकहोम पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितलं की, या माणसाला खूप काळापासून हनिंगेच्या दक्षिणेकडील स्टॉकहोल्म उपनगरातील अपार्टमेंटमध्ये डांबून ठेवण्यात आलं आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा 12 वर्षांचा असताना आईने त्याला ओढत शाळेमधून घरी आणलं आणि या अपार्टमेंटमध्ये डांबलं. तेंव्हापासून हा मुलगा तिथे आहे. गेल्या रविवारी एका नातेवाईकाला एक 41 वर्षीय व्यक्ती सापडली जेव्हा त्याच्या 70 वर्षीय आईला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या व्यक्तीच्या पायाला फोड आले होते, त्याला चालता येत नव्हते. त्याला दात देखील नव्हते तसेच त्याला धड बोलताही येत नव्हते. पोलिसांनी अधिक तपशीलावर भाष्य करणं टाळलंय पण म्हटलं की सध्या त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. त्याचे आजार आणि जखमा या काही जीवघेण्या नाहीयेत. या आईने आपला गुन्हा अमान्य केला आहे. ज्या नातेवाईकाने या डांबलेल्या व्यक्तीचा शोध लावला त्यांनी म्हटलं की ही अपार्टमेंट अनेक वर्षांपासून स्वच्छच केली नसल्याच्या घाणेरड्या अवस्थेत असल्याची भासली. तिथे मलविष्ठा, घाण आणि बरीच धुळ होती. कुजल्याचा भयंकर वास येत होता. अनेक वर्षांपासून कुणीच या घराला स्वच्छ केलं नव्हतं.

जेंव्हा मी हे सगळं पाहिलं तेंव्हा मी संपूर्णपणे धक्क्यामध्ये होतो. गेल्या 20 वर्षांपासून ही महिला त्या मुलाच्या आयुष्यावर ताबा ठेवून होती. इतका ताबा की आपण कधी कल्पनाही केली नसेल. मी फक्त आता याबाबतच समाधानी आहे की त्याला मदत मिळाली आहे आणि आता तो जगतोय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com