जगात कोरोनाचा कहर! पाच दिवसातील रुग्णांची संख्या तब्बल 10 लाखावर...

वृत्तसंस्था
Tuesday, 14 July 2020

जगभरात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत  असल्याचे चित्र आहे. केवळ पाच दिवसात जगात 10 लाख नवे रुग्ण सापडले आहे.

मुंबई; जगभरात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत  असल्याचे चित्र आहे. केवळ पाच दिवसात जगात 10 लाख नवे रुग्ण सापडले आहे. हे प्रमाण चिंताजनक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख लोकांचा मृत्यु झाला आहे. प्रतिबंधात्मक नियम न पाळल्यास सामान्य परिस्थिती येणे कठिण असल्याचा इशारा संघटनेने दिले.

वाचा - अनेक देशांची चुकीच्या मार्गाने वाटचाल; जागतिक आरोग्य संघटना

चार देश, 70 टक्के रुग्ण 
अमेरिकेत दिवसाला सरासरी 62 हजार रुग्ण सापडत आहेत: तर ब्राझीलमध्ये  सरासरी 45 हजार रुग्णांची भर पडत आहे.भारतात दिवसा सरासरी 25 ते 28 हजार नवे रुग्ण सापडत आहेत. तर रशिया, चिली, पेरु, मेक्सिको या देशामध्ये रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. नव्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण हे   अमेरिका,ब्राझील,भारत या तीन देशातून आहेत. 

कोरोना बळींचा आकडा 6 लाखावर 
जगात 1 कोटी 30 लाखापेक्षा अधिक जणांना कोरोना संसर्ग झाला असून यामध्ये एकट्या अमेरिकेत 33 लाखापेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर अमेरिका, ब्राझील, भारत आणि रशियातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 70 लाखाच्या जवळपास पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 71,800 जणांना मृत्यु झाला आहे. 

वाचा - 'भारतातली अयोध्या नकली'; नेपाळच्या पंतप्रधानांनी तोडले अकलेचे तारे!

देशात कोरोना रुग्णांची संख्या 9 लाखावर 
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला सरासरी 25 ते 28 हजारापर्यंत पोहोचली आहे. गेल्या 24 तासात देशात 28,598 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले असून, 553 जणांचा मृत्यु झाला आहे. यासोबत देशात एकुण कोरोना बाधितांची संख्या 9,06,752 एवढी आहे. तर  आतापर्यंत एकुण 23,727 जणांचा मृत्यु झाला आहे. 

...
जगात कोरोनाचा कहर 
पाच दिवस, 10 लाख रुग्ण
9 जुलै- 2,23,116
10 जुलै- 2,30,506
11 जुलै- 2,18,904
12 जुलै- 1,92,754
13 जुलै- 1,66,192

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's havoc in the world! The number of patients in five days is over 10 lakh.