esakal | 'भारतातली अयोध्या नकली'; नेपाळच्या पंतप्रधानांनी तोडले अकलेचे तारे!
sakal

बोलून बातमी शोधा

nepal pm says india created fake ayodhya

नेपाळमध्ये सरकारविरोधात राळ उठली असून, भारत ओली सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान ओली यांनी यापूर्वीच केलाय.

'भारतातली अयोध्या नकली'; नेपाळच्या पंतप्रधानांनी तोडले अकलेचे तारे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काठमांडू  : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आज अकलेचे तारे तोडले आहेत. नेपाळमधील सत्ता हातातून निसटत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान ओली यांनी भारतावर टीका करायला सुरुवात केलीय. भारतानं नेपाळवर सांस्कृतिक अतिक्रमण केलंय आणि त्यासाठी भारतात नकली आयोध्या उभारण्यात आली, असा जावईशोध ओली यांनी लगावलाय. खरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचा दावाही त्यांनी केलाय. 

नेपाळमध्ये सरकारविरोधात राळ उठली असून, भारत ओली सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान ओली यांनी यापूर्वीच केलाय. आता त्यांनी अयोध्येवरून वक्तव्य करत, भारताला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाय. ओली म्हणाले, 'रामायणाच्या काळात मोबाईल नव्हते. पण, मग राम जनकपूरपर्यंत कसे पोहोचले. नेपाळवर सांस्कृतिक अत्याचार करण्यात आलाय.' पंतप्रधान ओली यांनी रामायणातील संदर्भ नाकारले आहेत.

हे वाचा - अखेर नेपाळ झुकला; भारतीय न्यूज चॅनेलवरील बंदी हटवली

ओली म्हणाले, 'अजूनही भारतातल्या राजकुमार रामला आपण आपली सीता दिली, असा समज आहे. परंतु, भारतातली अयोध्या खरी नाही. आपण, आपल्याच देशातील राम या राजकुमाराला सीता दिली. नेपाळमधील अयोध्या बीरगंजपासून थोड्या पश्चिमेला आहे.' विज्ञाना आणि ज्ञानाचे शोधही भारतात नव्हे तर, नेपाळमध्ये लागल्याचा दावाही ओली यांनी केलाय. 
हे वाचा - काँग्रेसचा राजस्थानचा गड वाचवायला महाराष्ट्र धावला?

राजीनाम्याची मागणी 
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाबरोबरच, भारत-नेपाळही सीमावाद सुरू आहे. यावादात पाकिस्तान आणि चीन नेपाळला फूस लावत असल्याची चर्चा आहे. नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून केपी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. नेपाळ त्यांच्या संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन रद्द करून नवा अध्यादेश लागू करण्याची ओली यांनी तयारी केली आहे. नेपाळमधील विरोधी पक्ष नेताळी काँग्रेसचाच पाठिंबा मिळवण्याचा ओली यांचा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे. या सगळ्या घडामोडीत ओली यांचे अयोध्येविषयीचे वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे.