esakal | चीनची आडमुठी भूमिका; कोरोनावरील चर्चेस नकार, दोन देशांचा पाठिंबाही मिळवला

बोलून बातमी शोधा

coronavirus china rejects discussion united nations security council Estonia russia south africa

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत 5 लाख 33 हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, जवळपास 24 हजारहून अधिक नागरिकांचा यात बळी गेलाय.

चीनची आडमुठी भूमिका; कोरोनावरील चर्चेस नकार, दोन देशांचा पाठिंबाही मिळवला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जिनिव्हा Coronavirus:कोरोना व्हायरसची लागण चीनमधूनच झाल्याचं संपूर्ण जगाला माहिती असताना, चीनने संयुक्त राष्ट्रांमध्ये या विषयावर चर्चेस नकार दिलाय. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत यावर चर्चा होणार होती. परंतु, चीनने त्याला असमर्थता दर्शवली आहे. मुळात चीनमधील कोरोनाच्या आकड्यांविषयी संशय व्यक्त केला जात आहे. तसेच चीन कोरोनाच्या मदतीने जागतिक आरोग्य बाजारपेठेत दबदबा निर्माण करत आहे, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यातच संयुक्त राष्ट्रांमध्ये चीनने चर्चा करण्यास असमर्थता दाखवल्यामुळं पुन्हा चीनला टीकेला सामोरं जावं लागणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले सुरक्षा परिषदेत?
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत 5 लाख 33 हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, जवळपास 24 हजारहून अधिक नागरिकांचा यात बळी गेलाय. जवळपास संपूर्ण जग लॉक डाऊनमध्ये गेलंय. ज्या चीनमधून या कोरोना व्हायरसचा फैलाव झाला. त्या चीनमध्ये लागण झालेल्यांची संख्या कमी झाली आहे. चीन यातून सावरला. चीनने आता इतर देशांना मदत करायला सुरुवात केलीय. पण, चीन या विषयावर संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलायला तयार नाही. त्यामुळं चीनविषयी शंका उपस्थित केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत यावर चर्चा व्हावी, असा प्रस्ताव युरोपमधील इस्टोनिया या देशानं ठेवला होता. इस्टोनिया हा देश सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य नाही. पण, या देशाने कोरोना संदर्भात पारदर्शकता असावी या उद्देशानं कोरोनावर चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्याला चीनने नकार दिलाय. 

आणखी वाचा - इटली, स्पेननंतर आता अमेरिकेला कोरोनाचा विळखा

रशिया, अफ्रिकेचा चीनला पाठिंबा का?
कोरोना व्हायरस पसरण्यावर इस्टोनियानं चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण, चीनने याविषयावर 'सुरक्षा परिषदेत चर्चा करण्याचं कारण नाही, तसेच असा प्रस्ताव स्वीकारण्याची सक्तीही नाही,' असं स्पष्ट केलंय. चीनला या विषयावर रशिया आणि दक्षिण अफ्रिकेने पाठिंबा दिलाय. रशिया आणि अफ्रिकेचे चीनशी चांगले व्यापार संबंध आहेत. या दोन्ही देशांनी चीनची बाजू घेताना, 'जगाची सुरक्षा आणि शांतता याचा आणि व्हायरस पसरण्याचा कोणताही थेट संबंध नाही,' असं म्हटलंय. त्यामुळं चीन आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी घेतलेल्या या स्पष्ट भूमिकेमुळं आता सुरक्षा परिषदेत कोरोना व्हायरसवर चर्चा होणार नाही. रशिया आणि अफ्रिकेच्या भूमिकेमागं चीनसोबतची त्यांची आर्थिक गणितं असल्याचं मानलं जात आहे.

आणखी वाचा - भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; वाचा सविस्तर बातमी

इतिहास काय सांगतो?
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केवळ जगाची शांतता आणि सुरक्षा यावरच चर्चा होते आणि रोगराईवर चर्चा होत नाही, असे नाही. यापूर्वी 2014मध्ये इबोला नावाचा व्हायरस जगात सगळीकडे पसरला होता. त्यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत त्यावर चर्चा झाली होती. त्यामुळं यावेळी कोरोना व्हायरसवरही परिषदेत चर्चा अपेक्षित होती. यासारखे संकट भविष्यात जगावर आल्यास काय होऊ शकते, यावरूही चर्चा होण्याची अपेक्षा होती. पण, चीनच्या भूमिकेनं ते अशक्य झालंय.