Video:डोळ्यांत पाणी आणणारा चीनमधला व्हिडिओ; नर्सने लांबूनच घेतली मुलीची भेट

coronavirus China social media viral video nurse and her daughter
coronavirus China social media viral video nurse and her daughter

बीजिंग (चीन) coronavirus:जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनपुढं आज कोरोना व्हायरसचं आव्हान उभं आहे. किंबहुना चीनच नव्हे तर संपूर्ण मानवजातीपुढं कोरोनाविरुद्ध लढण्याचं आव्हान आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाव्हायरसनं थैमान घातलंय. चीनमधील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एका नर्सचा आणि तिच्या मुलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तो व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांता पाणी आल्याशिवाय राहत नाही. 

काय आहे व्हिडिओ?
चीनमध्ये सध्या हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसची तीव्रता अधिक आहे. आतापर्यंत 800हून अधिक जणांचा बळी या कोरोना व्हायरसने घेतला आहे. अशाच कोरोनाग्रस्त भागातील हेनाना राज्यात एका रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्या रुग्णालयातील एका नर्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुग्णांच्या सेवेत असल्यामुळं तिला मुलीला भेटता येत नाहीय. मुलीची आणि तिची ताटातूट होत आहे. त्यातच मुलीनं आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण, नर्स असलेल्या तिच्या आईनं तिला लांबूनच गळाभेट दिलीय. या व्हिडिओमध्ये आई आणि मुलगी दोघीही अश्रू ढाळताना दिसत आहे. त्यांची अवस्था पाहून, व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी येत आहे. व्हिडिओमध्ये नर्सने सुरक्षेसाठी ओव्हर कोट आणि मास्क घातला आहे. तसेच तिच्या मुलीलाही मास्क आणि ओव्हारकोटने सुरक्षित करण्यात आलंय. त्या मुलीनं घरातून आईसाठी खाऊ आणल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून, तो खाऊचा डबादेखील तिनं काही अंतरावर ठेवून आईला दिला आहे.

हा हजार नागरिक गंभीर
चीनमध्ये जवळपास 37 हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याची आहे. आज मृतांची संख्या 800च्यावर गेली असून, व्हायरसची लागण झालेल्यांपैकी 6 हजार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. चीनमध्ये हुबेई प्रांतात या व्हायरसची सर्वाधिक लागण झाली आहे. मृतांची संख्याही 2002-03मधील सार्स या संसर्गजन रोगाने जगभरात जितक्या नागरिकांचा बळी घेतला होता. त्यापेक्षा जास्त बळी कोरोना व्हायरसने घेतले आहेत.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com