विश्वास बसणार नाही; डॉक्टरांनी मास्क काढले, चीनचे वुहान शहर कोरोना मुक्त

टीम ई-सकाळ
शनिवार, 14 मार्च 2020

वुहान शहरातील डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आला स्माईल आहे. अर्थात डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील मास्क हटले आहेत.

वुहान (चीन) Coronavirus: संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यात चीनमधील डॉक्टरांना यश आलयं. चीनमधील हुबेई या प्रांतातील वुहान शहरातूनच हा जीवघेणा व्हायरस पसरला होता. चीनमध्ये या व्हायरसने आतापर्यंत तीन हजारहून अधिक जणांचा बळी घेतला होता. ता वुहान शहरातून कोरोनाचा निपटारा करण्यात डॉक्टरांना यश आल्यामुळं संपूर्ण जगासाठी ही समाधानाची बाब असल्याचं बोललं जातंय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय झालं होतं वुहानमध्ये
वुहान शहरातील डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आला स्माईल आहे. अर्थात डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील मास्क हटले आहेत. त्यामुळं त्यांची स्माईल सगळ्या जगाला दिसत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला वुहान शहरात भयाण स्थिती होती. शहरात कोरोना व्हायरसचा फैलाव इतक्या वेगानं होतं होता की, संपूर्ण जगाला धडकी भरली होती. वेगान होणाऱ्या प्रसारामुळं शहरात दोन हजार अतिरिक्त बेड सुरू करण्यात आले होते. अनेक सरकारी, खासगी हॉस्पिटलमधील जनरल वॉर्डचं रुपांतर विलगीकरण कक्षात करण्यात आलं होतं. कोरोनाचा फैलाव होण्याची भीती असल्यामुळं वुहान शहरातील हॉस्पिटल्समध्ये बेडची संख्या वाढवण्यात आली होती. सुमारे 2 हजार अतिरिक्त बेड वाढवण्यात आले होते. दोन स्वतंत्र हॉस्पिटल्स उभारण्यात आली होती. एखाद्या शहरात रोगाशी मुकाबला करताना इतक्या मोठ्याप्रमाणात बेडची गरज भासण्याची ही जगातील पहिलीच वेळ असावी. त्यामुळंच वुहान या शहरातकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं.

आणखी वाचा - महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला!

आणखी वाचा - सॅनिटायझरच्या अतिवापराने होऊ शकते नुकसान, वाचा परिणाम

आणि त्यांनी मास्क काढले!
वुहान शहावर कोरोना नावाचे आलेले काळे ढग आता दूर झाले आहेत. शहरातील डॉक्टरांच्या प्रयत्नां यश आले असून, एक एके पेशंट बरा होत गेला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत अतिदक्षता विभागांचे रुपांतर पुन्हा जनरल वॉर्डमध्ये करण्यात आले आहे. कोरोनाच्या भीतीने रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील प्रत्येकाने मास्क वापरण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यासाठी मास्क सक्तीचा केला होता. गेल्या काही आठवड्यांत वुहानमधील मास्क घातलेले आरोग्य कर्मचारी हे चित्र नित्याचे झाले होते. आता या मास्कपासून सुटका झाली आहे. एखाद्या इव्हेंटसारखा या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क काढला असून, जगभरात हा व्हिडिओ व्हायरल झालाय. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार चीनमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून, ती सध्या 81 हजार झाली आहे. एकट्या चीनमध्ये 3 हजारहून अधिक जणांचा बळी गेलाय तर, जगातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 हजार 400 झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china updates wuhan city all temporary hospitals closed