लसीशिवायच कोरोना विषाणूचा खात्मा होईल, पण....

टीम ई-सकाळ
Monday, 18 May 2020

सध्याच्या घडीला कोरोना विषाणूवर कोणताही उपाय नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग (social distancing) आणि योग्य ती खबरदारी हाच एकमेव पर्याय जगासमोर आहे. कोणता देश या जीवघेण्या आजारावर लस शोधून काढणार? आणि त्याला नेमका किती वेळ लागणार? याबाबतची चर्चा रंगत असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग विभागाचे माजी प्रमुख प्रोफेसर करोल सिकोरा या शास्त्रज्ञांनी (scientist) कोरोनासंदर्भात मोठा दावा केलाय.

लंडन : coronavirus जगाला हैराण करुन सोडणाऱ्या कोरोना विषाणूवरील प्रतिबंधात्मक लस Covid 19 Vaccine शोधण्यासाठी वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्याच्या घडीला कोरोना विषाणूवर कोणताही उपाय नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग (social distancing) आणि योग्य ती खबरदारी हाच एकमेव पर्याय जगासमोर आहे. कोणता देश या जीवघेण्या आजारावर लस शोधून काढणार? आणि त्याला नेमका किती वेळ लागणार? याबाबतची चर्चा रंगत असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग विभागाचे माजी प्रमुख प्रोफेसर करोल सिकोरा या शास्त्रज्ञांनी (scientist) कोरोनासंदर्भात मोठा दावा केलाय. कोरोनाविरोधातील प्रतिबंधात्मक लसीचा शोध लागण्यापूर्वीच कोरोना नैसर्गिकरित्या नष्ट होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.  

युरोपीयन राष्ट्र कोरोनामुक्त! हा आहे लॉकडाउन हटवणारा जगातील पहिला देश

सिकोरा म्हणाले की,  'कोरोना विषाणूचा जगभरात प्रत्येक ठिकाणी एकच प्रकार (पॅटर्न) आढळून येत आहे. या विषाणूमध्ये आपल्या अनुमानापेक्षा अधिक रोगप्रतिकारक क्षमता आहे. सातत्याने त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. हा विषाणू नैसर्गिकरित्या कमकूवत होईल, असा माझा अंदाज आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या निमयाचे पालन करुन कोरोनाग्रस्तांचा आकडा नियंत्रणात ठेवण्यावर भर द्यावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.   

या देशाचा एकुण रुग्णांच्या संख्येत आता जगामध्ये पाचवा क्रमांक

कोरोनाविरोधातील लढा जिंकायचा असेल तर लसीचा शोध लागणे खूप महत्त्वाचे आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी यापूर्वी म्हटले होते. कोरोनावरील लसीचा शोध लागणे मुश्किल वाटते, अशीही भिती त्यांनी व्यक्त केली होती. चीनच्या वुहान शहरातून जगभरात परसलेल्या कोरोनाने विकसित राष्ट्रांनाही हतबल केले आहे. आरोग्यासंदर्भात मोठमोठे तंत्रज्ञान विकसित असणाऱ्या इटली आणि अमेरिका यासारख्या राष्ट्रातही कोरोनाने कहर केल्याचे पाहायला मिळाले. जगभरात 3 लाखाहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संसर्ग रोखण्यासाठी रसायनांची फवारणी केली, पण... 

40 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या विषाणूचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील विविध देशात लॉकडाउनसारखे कठोर पावले उचलण्यात आली असून या निर्णयामुळे आर्थिक संकटाला निमंत्रण मिळाले आहे. कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीने जागतिक अर्थकारणावरही घाला घातलाय. यातून सावरण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करत असून परिस्थिती पूर्ववत होऊन सर्वकाही सुरळीत होईल, या सकारात्मकतेने प्रत्येक देश कोरोनाविरोधात उपाययोजना करत असल्याचे पाहायला मिळते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus could burn out naturally before vaccine developed claims who top scientist