Coronavirus : कच्च्या तेलालाही कोरोनाचा विळखा; दरांत झाली मोठी...

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

जर कोरोना विषाणूचा फैलाव आशियाबाहेर आणि अमेरिकेत आणखी मोठ्या प्रमाणात झाला, तर कच्च्या तेलाच्या दरामध्ये आणखी मोठी घसरण होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येते आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रभावामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे दर जानेवारी 2019 नंतरच्या नीचांकी पातळीवर पोचले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधून फैलाव झालेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, जगभरातील 48 देशांमध्ये पाय पसरले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याचाच परिणाम होत कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत आहे.

- Coronavirus : कोरोनाच्या मृतांची संख्या वाढतीये; आता...

कच्च्या तेलाचे दर गेल्यावर्षी 4 जानेवारी 2019 रोजी 47.93 डॉलर प्रति बॅरलवर पोचले होते. आता पुन्हा त्यात घट होत ते आंतरराष्ट्रीय बाजारात 52.66 डॉलर प्रति बॅरलवर पोचले आहेत. ब्रेंट क्रुडच्या दरामध्ये सलग पाच सत्रांमध्ये घसरण होत एकूण 11 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. 

- माजी मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला; कार्यकर्त्यांनी फेकल्या अंडी, टोमॅटो आणि चपला!

चीनबरोबरच आता इराण आणि इटली या देशांमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रसार होताना दिसतो आहे. या सर्वांचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर झाला आहे. बहुतांश आशियाई शेअर बाजारात घसरण होते आहे. जर कोरोना विषाणूचा फैलाव आशियाबाहेर आणि अमेरिकेत आणखी मोठ्या प्रमाणात झाला, तर कच्च्या तेलाच्या दरामध्ये आणखी मोठी घसरण होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येते आहे. 

- मंदिराजवळ घबाड सापडलं; खोदकामावेळी मिळाली ५०५ सोन्याची नाणी!

कच्च्या तेलाच्या दरामध्ये होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्‍सपोर्टिंग कन्ट्रीजकडून (ओपेक) आणि रशियाकडून कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट केली जाण्याची शक्‍यता आहे. रशिया आणि त्याच्या सहकारी देशांच्या संघटनेला ओपेक प्लस असे संबोधले जाते. ओपेक प्लसची व्हिएन्ना येथे पाच आणि सहा मार्चला बैठक होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus fears are causing oil prices to collapse continues